गाझियाबाद : कौशांबी पोलिस ठाण्याअंतर्गत वैशाली परिसरात एका मॉलमधील स्पा सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट (Sex Racket)चा भांडाफोड केला आहे. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटर (Spa Center) चालवणाऱ्या तरुणीसह 9 जणांना अटक (Arrest) केली आहे. यामध्ये 4 तरुणी आणि 5 तरुणांचा समावेश आहे. मात्र स्पा सेंटरचा मालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या स्पा सेंटरमधील एक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकली. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Ghaziabad police raided a spa center and exposed a sex racket)
गाझियाबादमधील एका मॉलच्या बेसमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरु होता. या रुद्रा नामक स्पा सेंटरमधील एक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये छापा टाकला. यावेळी स्पा सेंटरमधील दोन खोल्यांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली असून यात स्पा सेंटर चालविणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे. तर स्पा सेंटरचा मालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
याआधी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अंधेरी पूर्वेतील एका बारवर छापेमारी करत 12 बारबालांची सुटका केली होती. समाजसेवक शाखेचे एपीआय कानवडे व त्यांच्या स्टाफने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाईट लवर बारमध्ये मध्यरात्री कारवाई केली. बारमध्ये सुरु असलेला बारवाल्यांचं डान्स क्लिप वरून समाजसेवा शाखेने कारवाई केली. यामध्ये 30 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात हॉटेलच्या स्टाफ आणि कस्टमरचा समावेश आहे. (In Ghaziabad police raided a spa center and exposed a sex racket)
इतर बातम्या
Igatpuri Youth Suicide : मुंबईतील तरुणाचा इगतपुरीतील उंटदरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न