मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya)आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंगले कुठे आहेत? हे दाखवावं असे आवाहन सोमय्यांना केले होते. त्यानंतर सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली, त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. आणि 2014 ला ही जमीन मनिषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे. याच बंगल्यांवरून राज्यात सध्या मोठा पॉलिटीकल राडा सुरू आहे. सोमय्या जे बंगले सांगत आहेत ते बंगले अस्तित्वातच नाही, आपण जाऊन पिकनिक काढून पाहून येऊ असे संजय राऊत मंगळवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यानंतर हा बंगल्यांचा वाद पोकसमध्ये आलाय.
सरपंच प्रशांत मिसळ काय म्हणाले?
ज्या कोर्लई गावातील 19 बंगल्यांवरुन संजय राऊत आणि किरीट सोमय्या असा वाद सुरु आहे, त्या गावच्या सरपंचांनी काय म्हटलं ऐका.. @rautsanjay61 @ShivSena @KiritSomaiya pic.twitter.com/TTBFMqtnmq
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2022
सोमय्यांचे आरोप काय?
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. 2008 मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केलाय. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, 31 मार्च 2021 पर्यंत अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर कर भरत आहेत. याचा अर्थ जागा केव्हा घेतली रश्मी आणि मनिषा यांनी 2013 मध्ये एमओयू केलं. जेव्हा वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हा ग्रामपंचायतीचा अधिकारय. जो ‘आरटीआय’मधून समोर आला. रश्मी आणि मनीषा यांच्यातर्फे 30 जाने 2019 रोजी घरपट्टी त्यांच्या नावे करण्याचा अर्ज आला आहे. आणि ग्रामपंचायत त्यांचा अर्ज मान्य करून घरं करत आहेत, अशी माहिती सोमय्यांनी सकाळीच दिली आहे.