Maharashtra Assembly Monsoon Session 2022 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधान सभेच्या सर्व 55 आमदारांना पक्षादेश जारी

| Updated on: Aug 16, 2022 | 6:18 PM

उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2022 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधान सभेच्या सर्व 55 आमदारांना पक्षादेश जारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (Shivsena) विधान सभेच्या सर्व 55 आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी केला पक्षादेश जारी केला आहे. अधिवेशन काळात दररोज संपूर्ण दिवस कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचा पक्षादेश जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचें प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून पक्ष आमचा म्हणून दोन गटांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाचा अद्याप निकाल देण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते आमचा पक्ष असल्याचा आरोप करीत आहेत. उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे.

sunil prabhu

पत्र

महाराष्ट्रातील मंत्र्यांना खात्यांचे वाटप

मंत्रिपरिषदेत 18 मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर पाच दिवसांनंतर रविवारी खात्यांचे वाटप झाले. शिंदे यांच्याकडे शहर विकास आणि अन्य 11 खाती ठेवली आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाच्या गृहखात्याच्या वाटपासह भाजपला अनेक महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.

खरी शिवसेना कोणाची ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “खरी” शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढतील. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेतृत्व करतात. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, बंडखोर गटच ‘खऱ्या’ शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतो. येत्या महापालिका निवडणुकीत ठाण्यासह सर्व ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीने लढणार असल्याचे शिंदे यांनी नुकतेचं जाहीर केले आहे.

हे सुद्धा वाचा

40 आमदारांपैकी बरेचसे आमदार मुंबई आणि महानगरातील आहेत

शिंदे यांच्या घोषणेला सध्या अधिक महत्त्व आहे. कारण बंडखोर 40 आमदारांपैकी बरेचसे आमदार मुंबई आणि महानगरातील आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मराठी ‘व्होट बँक’ला तडा जाऊ शकतो. ठाणे महापालिकेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ठाण्यात गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता असून मतदार योग्य निवड करतील. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांना बहुमत मिळाले होते. परंतु नंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष वेगळे झाले.