“सिंचन, विजेसाठी पाणी नाही; मन की बात मिळते,” के. चंद्रशेखर राव यांचा टोला

| Updated on: Feb 05, 2023 | 4:04 PM

भाजप देश विकून देश चालवणारा पक्ष आहे. आम्हाला सिंचनासाठी, विजेसाठी पाणी मिळत नाही. मात्र भाषण मिळते. मन की बात वगैरे वगैरे, असा टोलाही के. चंद्रशेखर राव यांनी लगावला.

सिंचन, विजेसाठी पाणी नाही; मन की बात मिळते, के. चंद्रशेखर राव यांचा टोला
के. चंद्रशेखर राव
Follow us on

नांदेड : देशामध्ये मोठे परिवर्तन करण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक नेते पंतप्रधान झाले. आपणच त्यांना पंतप्रधान केले. हे नेते मोठे भाषण देतात. 75 वर्षांनंतर अनेक पंतप्रधान बनले. मात्र तरीही देशात प्यायला, सिंचनाला पाणी मिळत नाही. मुबलक वीज मिळत नाही. समाजात आता एकजूट झाले पाहिजे, असं मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं. ते नांदेडमध्ये (Nanded) सभेत बोलत होते. के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या का होतात याचा विचार करा. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना काय वाटत असेल?, असा सवालही के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थित केला.

अबकी बार किसान सरकार!

देशाला अन्नधान्य देणारा अन्नदाता, दिवसभर कष्ट करून कशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो याचे कारण काय? यावर विचार करण्याची गरज आहे. नेते लोकं मोठंमोठे भाषणे देतात. विधानसभेत लोकसभेत मोठे भाषण देतात. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पीक थांबायला तयार नाही. त्यामुळे आता आम्ही नारा देतोय अबकी बार किसान सरकार!

हे सुद्धा वाचा

शेतकरी, कामगार एकत्र यावेत

के. चंद्रशेखर राव म्हणाले, देशात शेतकऱ्यांची संख्या 42 टक्के पेक्षा जास्त आहे. शेतकरी आणि कामगार दोन्ही मिळून 50 टक्के पेक्षा जास्त आहे. हे दोघे एक झाले तर 50 टक्के पेक्षा जास्त होत आहेत. हे दोघे एकत्र झाले तर सरकार बनवायला अवघड नाही.

भाषण नव्हे पाणी हवे

काँग्रेसशिवाय पर्याय नाही. भाजपा या देशाच्या संविधानासाठी अडचणीचा पक्ष आहे. देश विकून देश चालवणारा पक्ष आहे. आम्हाला सिंचनासाठी, विजेसाठी पाणी मिळत नाही. मात्र भाषण मिळते. मन की बात वगैरे वगैरे, असा टोलाही के. चंद्रशेखर राव यांनी लगावला.

सर्वांना पाणी का नाही

जगातील सर्वात मोठा पाणीसाठा झिम्बाब्वेमध्ये आहे. तिथे 6 हजार 533 टीएमसी साठवण क्षमता आहे. भारतात एवढे पाणी वाहून जाते. मग इथे असे मोठे धरण का बनत नाहीत? भारतात एकूण 41 हजार कोटी एकर जमीन आहे. या सर्वांना पाणी दिले जाऊ शकते. मग का दिले जात नाही?, असा सवालही के.चंद्रशेखर राव यांनी विचारला.