नारायण राणेंच्या वक्तव्याचा मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार? फडणवीसांचं थेट उत्तर

| Updated on: Aug 24, 2021 | 2:09 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील वक्तव्यामुळे भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (devendra fadnavis)

नारायण राणेंच्या वक्तव्याचा मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार? फडणवीसांचं थेट उत्तर
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील वक्तव्यामुळे भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळली आहे. नुकसान झालं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचंच होणार आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (is ranes controversial statements impact will in bmc election?)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि भाजपमधील राड्यावर भाष्य केलं. राणेंच्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला नुकसान होईल का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर फडणवीसांनी थेट उत्तर दिलं. महाराष्ट्रात शर्जिल उस्मानी येऊन हिंदुत्वाला शिव्या देतो. त्याला महाविकास आघाडीचं सरकार संरक्षण देतं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत झालं तर त्यांचंच नुकसान होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

तरीही यात्रा थांबणार नाही

राणे साहेबांना बेकायदेशीरपणे अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. ही जी कारवाई आहे ती अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले.

स्वत:ला छत्रपती समजतात का?

खरं म्हणजे ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केलीय, त्याचं मला आश्चर्य वाटतंय. शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आज मात्र आख्खं पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी सज्ज झालंय. एक पोलीस पथक नाशिकहून, एक पुण्याहून निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेसन्स नाही, मी आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं, ते स्वत:ला छत्रपती समजतात का? की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा असे आदेश देण्याचा अधिकार त्यांना कोणत्या कायद्याने दिला. मुळात हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल, असं ते म्हणाले.

पोलीस लोटांगण घालत आहेत

राज्यात पोलिसांचा गैरवापर सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, त्यांच्यासोबत पाच वर्ष मी काम केलं आहे. संपूर्ण देशात नि:पक्ष पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस कारवाई करायला लागले तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांडं झाली आहेत, त्यामुळे प्रामाणिक पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे, असंही त्यांनी सांगितलं. (is ranes controversial statements impact will in bmc election?)

 

संबंधित बातम्या:

ते स्वत:ला छत्रपती समजतात काय?, राणेंवरील पोलीस कारवाईच्या चर्चेवर फडणवीसांचा सवाल

राणेंना अटक केली तर जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार? फडणवीसांकडून प्लॅन जाहीर

BREAKING : Narayan Rane : नाशिक पोलिसांनी प्लॅन बदलला, नारायण राणेंना चिपळूणमध्ये अटक करणार नाही!

(is ranes controversial statements impact will in bmc election?)