मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. जवळपास 30 तासांपेक्षा जास्त काळापासून हे धाडसत्र सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून, हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे.
सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली.
अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे.
मुंबईत पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया ग्रुप, डीबी रियालिटी, या कंपन्यांच्या मालकांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी झाल्याची सूत्रांची माहिती.
देशामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम करण्यात आलं. तो दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जाईल अशी घटना झाली. त्याचा निषेध म्हमून महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर घेतला आहे.
पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही. कर कसा चुकवता येणार नाही, याची मी अधिकाऱ्यांशी बोलत असतो. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांसहित सर्व कंपन्यांनी कर भरला पाहिजे या मताचा मी आहे. आर्थिक शिस्त कोणी मोडू नये, असे अजित पवार म्हणाले.
आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभागाचे त्यांचं काम करणार आहेत. सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात मी बोलेन. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाचा कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे. काय अयोग्य आहे, कॅश सापडतात का तेही ते चे करतात. ते चौकशी करुन जातील. मग मी यावर भाष्य करेल.
पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांचे अंतर ठेवले जात होते. पण पहिला डोस लवकर मिळाला नसल्यामुळे दुसऱ्या डोसचा कालवाधी 84 दिवसांचा करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या डोससाठीचा कालावधी कमी करण्यासाठी केंद्राशी बोलणार आहेत.
पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा 1कोटी 9 लाखांचा टप्पा केला आहे. तसेच मिशन कवच कुंडल अभियान आठ ते 14 ऑक्टोबर या काळात राबवण्याचे ठरले आहे. शहरी तसेच ग्रामीण अशा दोन्ही भागात किमान पहिला डोस तरी सर्वांनाच भेटायला हवा. पूर्ण जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पहिला डोस झालेल्या लाभार्त्यांचे प्रमाण 88 टक्के आहे. तर दुसरा डोस झालेल्यांचे प्रमाण 49 टक्के आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 20 टक्क्यापेक्षा कमी कोरोना बाधित आढळून आले आहेत. हा सगळा आठवड्यातील आढावा आहे, असे अजित पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर तीन टक्के आहे. आपल्या पुणे शहरात पहिला लसीचा डोस घेणाऱ्याचे प्रमाण जास्त आहे. येथे 103 टक्के हे प्रमाण पहिला डोस घेणाऱ्यांचे आहे. ग्रामीण भागातही पुण्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. पिंपरी चिंचवड लसीकरण थोडे मागे पडले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त तसेच महापौर यांना लसीकरण वाढवण्याची सूचना केली आहे.
आपण काही ठिकाणी 75 तास लसीकरणाचा कार्यक्रम राबवला. तरीदेखील स्लममध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे स्लममध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले.
सोमवारी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारशी संलग्नित असलेले ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात सोमवारपासून परवानगी
महाराष्ट्रात लसीकरणासाठी पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.
झोपडपट्टी भागात लसीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या आहेत.
अजित पवार माध्यमांशी बोलत आहेत. ते पुण्यात बोलत आहेत.
– सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी
– 22 ऑक्टोबरपर्यन्त नाट्यगृह सुरू करणार
पुणे जिल्हा कोरोना आढावा बैठक संपली
थोड्याच वेळात अजित पवार मीडियाशी संवाद साधणार
अतिवृष्टीचे पैसे द्यायला पैसे नाहीत
मात्र केंद्र सरकार पैसे आज उद्या करते
मी मंत्री असताना गुजरातमध्ये निधी देऊ नका असे म्हणत होते
मी मात्र देश चालवायचा आहे असे म्हणून संकुचितपणा न ठेवता मदत केली
गुजरातमध्ये मी पक्ष बघितला नाही
तिथल्या लोकांशी बंधिलकी ठेवली
इथे मात्र राज्यात परिस्थिती वेगळी आहे
येत्या स्थानिक संस्थामध्ये भाजपला खड्यासारखे बाजूला करूया
जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केलेला रुजला नाही हे एका सत्ताधाऱ्याने मला सांगितले म्हणून छापेमारी केली.
छापा मारा काही करा सामाजिक बांधीलकी कधीच सोडणार नाही
आघाडीचे सरकार असले तरी कुणीही काही म्हंटले तरी सामंजस्यपणाने सरकार चालविले जात आहे
दिल्लीवरून या सरकारला रोज त्रास अनेक गोष्टी वरून दिला जातो. मात्र राज्याचा वाटा केंद्र सरकार देत नाही
आज देऊ उद्या करत आहे.
शेतकरी रस्त्यावर घरदार सोडुन बसलाय
एक वर्षांपासून आंदोलन मात्र कुणी ढुंकून पाहत नाही
भाजपच्या नेत्याच्या गाड्याने चिरडलं
त्यांची हत्या करण्यात आली आहे
त्यांची जागा दाखवण्या शिवाय गत्यंतर नाही
भाजपकजी नीती ही शेतकरी विरोधी
शरद पवारांनी काय केले असा प्रश्न एकाने केला
मी साखर कारखानदार नाही
तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन
एक रकमी रक्कम द्या, असा एक शब्द निघालाय
जे आम्हाला सोडून गेले त्यांची जनतेने सुट्टी केली-
आम्ही थंड डोक्याने बसलो होतो
जे आम्हाला सोडून गेले त्यांची जनतेने सुट्टी केली-
महाराष्ट्रात तिन्ही पक्षाचे मिळून चांगले करत आहेत
मात्र सगळ्यात नागरिकांचे पक्ष सोडवतो तो राष्ट्रवादी
हे सरकार टिकवायचे आहे
मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे
हे राज्य चुकीच्या हाथात द्यायचा नाही
त्याचा अनुभव चांगला नाही
या देशातील 60 टक्के पेक्षा लोक काळ्या मातीचे इमान राखतो
शेतकऱ्याचे हिताचे समर्थांन आहे त्याला आपली साथ
शेतीमालाच्या किमतीसंबधी दिल्लीच्या बॉर्डर वर एक वर्ष आंदोलन आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर येथे आहेत. येथे बोलताना त्यांनी भाजपवर शरसंधान साधले.
यापूर्वी मी कोरोनाचे संकट होते त्यावेळी आलो होतो.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमूळे पीकपाणी उद्ध्वस्त झाले
महाराष्ट्रातील सहकारी अडचणी आहेत त्यावेळी मी हे सगळं जाणून घेण्यासाठी दौरा करतो
त्याची सुरुवात मी सोलापूर पासून करतो
अनेक लोक सोडून गेले
महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बाबतीत अनेक लिखाण होत होते
जे आम्हाला सोडून गेले त्यांची जनतेने सुट्टी केली
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात
– बैठकीला खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि जिल्हाधिकारी उपस्थित
– कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर अजितदादा बैठकीला पोहचले
बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधणार
अजित पवार सध्या पुण्यात आहेत. राष्ट्रवादीतर्फे आयोजित केलेल्या आंदोलनात अजित पवार सामील झाले आहेत. अजित पवार आपल्या समर्थकांमध्ये येताच त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत आहे. दादा… दादा…. नावाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ओरडत असून राष्ट्रवादी तसेच अजित पवार यांचा जयजयकार करण्यात येत आहे.
पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय. अजित पवार यांचा शुक्रवारी पुणे दौरा असतो. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, सूडबुद्धीने त्यांच्या निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकलेत, असं म्हणत त्यांनी भाजपवर आरोप केलेत. महागाई आणि शेतकऱ्यांना चिरडल्याचा विषय डायव्हर्ट व्हावा, यासाठी हा खटाटोप सुरू आहे, असं राष्ट्रवादीने नमूद केलं
चंद्रपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर आयकर धाडी, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तपास यंत्रणांना काम करू द्यावे अशी घेतली भूमिका, यासंबंधी कुठलीही माहिती नसल्याने भाष्य करणार नसल्याचे विधान, तपास यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप नको असे व्यक्त केले मत
माझ्यासाठी नवरात्री म्हणजे आई आहे. घटस्थापनेला मंदिरं उघडली, त्याबद्दल धन्यवाद. सरकारने नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करावं, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्या जात आहेत. पण ते फक्त दादाचे नातेवाईक नाहीत, माझेही नातेवाईक आहेत. आमची जॉईंट फॅमिली आहे. संघर्ष करणं ही पवारांची खासियत, कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, झुकणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.
अजित पवारांवर IT धाडी कुठे कुठे?
– मुंबईतील कार्यालय
– बारामती, काटेवाडी
– कोल्हापूर – बहिणीच्या कार्यालयावर
– पुणे
– नगर – साखऱ कारखान
– सातार –
-नंदुरबार – निकटवर्तीय
— दौंड
अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली. कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर देखील अद्याप चौकशी सुरू आहे. 16 व्यक्तींच्या पथकाकडून सुरू आहे चौकशी, सूत्रांची माहिती, काल गुरुवारी सकाळी 6 वाजेपासून सुरू आहे चौकशी
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीचे कार्यालय आणि घरी दुसऱ्या दिवशीही सुरू झाली छापेमारे, 15 मिनिटांपासून अधिकारी विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिशिंगच्या कार्यालयात, Crpf चे जवान कार्यालयाबाहेर केले तैनात
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.
बारामती : डायनामिक्स कंपनीत अजूनही आयकर विभागाची तपासणी सुरु, काल सकाळी आयकर विभागाचे बारामतीत छापे. बारामती एमआयडीसीतील डायनामिक्स कंपनीत चौकशी सुरु. काटेवाडीतही झाली होती आयकर विभागाची कारवाई..