सिंधुदुर्गात जमावबंदी; राणे म्हणतात, सिंधुदुर्गापासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार, त्यात व्यत्यय येणार नाही

| Updated on: Aug 25, 2021 | 4:46 PM

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. परवापासून मी यात्रा सुरू करणार आहे. सिंधुदुर्गापासून यात्रा सुरूच ठेवणार आहे. (Narayan Rane)

सिंधुदुर्गात जमावबंदी; राणे म्हणतात, सिंधुदुर्गापासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार, त्यात व्यत्यय येणार नाही
Narayan Rane
Follow us on

मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. परवापासून मी यात्रा सुरू करणार आहे. सिंधुदुर्गापासून यात्रा सुरूच ठेवणार आहे. त्यात व्यत्यय पडणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात जमावबंदी असतानाही राणेंनी जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (jan ashirwad yatra will continue from sindhudurg, says Narayan Rane)

कालच्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रत्नागिरीवरून सकाळी साडेपाच वाजता मी मुंबईत पोहोचलो. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. याचा अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटलं नाही. म्हणून पत्रकारांना दौऱ्याची माहिती देण्यासाठी पीसी घेतली आहे, असं राणेंनी सुरुवातीला स्पष्ट केलं.

मोदींनी सांगितलं म्हणून जन आशीर्वाद यात्रा

या काळात मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा माझा गैरफायदा घेत आहेत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं आहे. ही जन आशीर्वाद यात्रा कशासाठी होती? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी ही यात्रा होती. कॅबिनेटमध्ये माझा समावेश करण्यात आला. माझ्यासह अनेकजण मंत्री झाले. त्यामुळे मोदींनी आम्हा सर्वांना जनतेचे आशीर्वाद घेण्यास सांगितलं. म्हणून माझ्या जन आशीर्वाद यात्रेला 19 तारखेपासून सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं.

मी असं काय बोललो, त्याचा राग आला?

या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?, असा सवाल त्यांनी केला. (jan ashirwad yatra will continue from sindhudurg, says Narayan Rane)

 

संबंधित बातम्या:

शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला

मुख्यमंत्र्यांचं अज्ञान, अनिल परबांचा दबाव, राणेंच्या अटकेमागची CBI चौकशी करा, Video दाखवून भाजपची मागणी

Exclusive Video | नारायण राणेंच्या अटकेसाठी अनिल परबांचा फोन, पोलिसांवर दबाव?

(jan ashirwad yatra will continue from sindhudurg, says Narayan Rane)