मुंबई : शिवसेनेतील नाराज मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर गटनेतेपदी आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण, पुरेसं संख्याबळ नसताना, आमच्याकडे 35 आमदार असताना, पुरेसं संख्याबळ आणलं कुठून, असे सवाल एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी (MLA) केले आहेत. त्यामुळे अजय चौधरी यांची नियुक्ती वादात अडकण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार सूरतमध्ये आहे. त्यामुळे कधीही हे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी सूरतमध्ये जाणून एकनाथ शिंदेंची मनधरणी केली. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही.
दुपारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ गटनेतेपदावरुन त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्याऐवजी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याचाच अर्थ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे मार्ग प्रत्यक्ष चर्चेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी थांबवल्याचा हा संदेश मानला जातो आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेतेपदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करता येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या बैठकीत हा निर्णय झाला, त्या ठिकाणी शिवसेनेचे बहुसंख्य आमदार उपस्थितच नसल्याचा दावा करण्यात येते आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेते पदावरुन शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता शिवसेना आमदारांचे संख्याबळ कुणाकडे किती आहे, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा वाद चिघळत राहणार असल्याची शक्यता आहे.
गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण, पुरेसं संख्याबळ नसताना, आमच्याकडे 35 आमदार असताना, पुरेसं संख्याबळ आणलं कुठून, असे सवाल एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी केले आहेत. आधीच एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार सूरतमध्ये आहे. त्यामुळे कधीही हे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.