पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज मावळमध्ये पोहोचली. त्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या, पक्षाकडून काही अपेक्षा असतील त्या समजून घेण्यासाठी सुरु करण्यात आलीय. ही यात्रा सुरु झाल्यापासून आम्हाला प्रत्येक तालुक्यातील शरद पवारांची (Sharad Pawar) ताकद समजली. आता 2024 ला शरद पवार यांनी मोठी भेट द्यायची आहे, असा आदेशच जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षात काम करत आहोत. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. एकत्रित काम करायचं म्हणून आम्ही ती संधी सोडली. महाराष्ट्रात 2024 ला निवडणुकांमध्ये सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द तुमच्यात हवी. शरद पवार यांनी उभं आयुष्य वेचलं. आजही ते 24 तास काम करतात. त्या शरद पवार साहेबांना 2024 साली सर्वात मोठी भेट द्यायची आहे. 2024 ला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे, राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे आहेत आणि ते काम तुम्ही आम्ही करायचं आहे.
यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक एक कार्यकर्ता जोडला जात असून आज आपला पक्ष तळागाळात उभा होत आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. pic.twitter.com/PuVQdfxOtR
— NCP (@NCPspeaks) February 26, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळात आम्हाला झुकायचं नाही ही शिकवण दिली. महाराष्ट्राला कायम दिल्लीश्वरांनी कमी पाहिलं. पण महाराष्ट्र कधीही झुकला नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. कोण फुटत नाही म्हणून मंत्र्यांवर धाडी सुरु केल्या आहेत. कुणी तरी आरोप केले, पुरावा नसताना अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली. जाणूनबुजून सीबीआय, ईडी कारवाई करते. नवाब मलिक यांची काय चूक आहे. NIA लाही मध्ये आणायचा प्रयत्न केला, दाऊद, दहशतवाद असा गाजावाजा करणार आणि मंत्र्यांना बदमान करण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केलीय.
मावळाच्या भूमीने आपल्याला शिवरायांचे शौर्य सांगितले आहे. दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे, ती यापुढेही कायम राहील असा दावा ना. जयंत पाटील यांनी केला.
— NCP (@NCPspeaks) February 26, 2022
इतर बातम्या :