मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील राज्यसभेत शिवाजी महाराजांच्या घोषणांवरील आक्षेपावर भाष्य केलं आहे (Jayant Patil on Udayanraje Bhosale). खासदार उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर आहे. कुणीही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करु नये, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी सहकारी साखर कारखाने आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांच्या ईदबाबतच्या वक्तव्यावरही भाष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही.” “सहकारी कारखान्यांना जी मदत लागेल ती राज्य सरकार देत आहे. कारखान्यांना राज्य सरकार हमी देखील देणार आहे. यावर्षी देखील साखर कारखान्यांचं गाळप चांगलं होईल. साधारण महाराष्ट्रात 35 कारखाने आहेत. यापैकी ज्यांना मदत गरजेची आहे त्यांना राज्य सरकार मदत करेल,” असंही जयंत पाटील म्हणाले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “राज्यातील सहकारी कारखाने सुरु झाले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. आजारी असलेल्या कारखान्यांना काय करता येईल यासाठी चर्चा झाली. 36 कारखाने आहेत त्यांच्या स्थितीवरही चर्चा झाली. राज्य सरकार सर्व साखर कारखान्यांना सहकार्य करणार आहे.”
“धार्मिक सण साजरे करताना कोरोनाचं भान राखलं पाहिजे”
जयंत पाटील यांनी यावेळी बकरी ईदबाबत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या विधानावरही मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “कोणतेही धार्मिक सण साजरे करताना कोरोना संसर्गाच्या संकटाचं भान राखलं पाहिजे.”
संबंधित व्हिडीओ:
Venkaiah Naidu | ‘जय भवानी, जय शिवाजी’ वादावर व्यंकय्या नायडू यांची पहिली प्रतिक्रिया
व्यंकय्या नायडू नियमाने वागले, पण नियम आणि भावना वेगळ्या, शिवराय आमचं दैवत : संजय राऊत
दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये, शिवराय मोठे की बाळासाहेब ठाकरे हे सांगा : उदयनराजे भोसले
Jayant Patil on Udayanraje Bhosale