सिंधुदुर्ग: अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. त्यात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असं सांगतानाच पूर्वीच्या सरकारने हे प्रकरण दाबलं होतं, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (jayant patil slams bjp over anvay naik suicide case)
कोकण दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी हा आरोप केला. अर्णव गोस्वामी यांना पत्रकारीतेप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णव यांचे नाव आहे. त्यांच्या एकट्याचंच नव्हे तर आणखी दोघांचं त्यात नाव असून त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचं पाटील म्हणाले.
नाईक कुटुंबांनी कोर्टाला विनंती केल्यानंतर कोर्टाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. पूर्वीच्या सरकराने हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो. मात्र, पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला, असं सांगतानाच आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान आहे, असं पाटील म्हणाले.
यावेळी पाटील यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अधिक भाष्य टाळलं. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे. तिच आमची भूमिका आहे. त्यात वेगळं सांगण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. मेट्रो कारशेडबाबत केंद्राने तशी भूमिका का घेतली हे माहीत नाही. तपशीलात जाऊन त्याची माहिती घ्यावी लागेल, असं सांगून त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य टाळलं. (jayant patil slams bjp over anvay naik suicide case)
मराठा आरक्षण प्रश्नी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत त्यांना विचारलं असता मेटेंचं वक्तव्य मी पाहिलेलं नाही. मी हल्ली टीव्हीही पाहत नाही, असं ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. भाजपने याप्रकरणी दिलेले वकीलच खटला लढत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, मराठा समाजाच्या हिताचा प्रश्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असंही ते म्हणाले.
VIDEO : Hemant Bhosle | अर्णव गोस्वामी यांचे महाराष्ट्रात फार काही समर्थक नाही,काही प्रमाणात भाजपचे समर्थक : हेमंत भोसले pic.twitter.com/ueG6LJpBXq
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
संबंधित बातम्या:
अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी; सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा निर्णय
Arnab Goswami | अर्णव गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी…
(jayant patil slams bjp over anvay naik suicide case)