मुंबई : “एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नसतं (Jayant Patil Suggetion to Rohit Pawar). काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा”, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे. रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात रंगलेल्या ट्विटर वॉरवर जयंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया दिली (Jayant Patil Suggetion to Rohit Pawar).
“आपली पातळी किती खाली न्यायाची? एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नसतं. काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा. आपण एका मर्यादेपर्यंत कुणाच्या तोंडाला लागायचं हे ठरवायचं असतं. एका मर्यादेनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. काही लोक घरी बसून वेगवेगळ्या वल्गना करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. रोहित पवार दुर्लश करतील, असा मला विश्वास आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी केल्यानंतर निलेश राणेंनी त्यावर आक्षेप घेणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला नातू रोहित पवार यांनी उत्तर दिल्यापासून दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगला आहे.
असा सुरु झाला ट्विटर वॉर
निलेश राणे यांचे पहिले ट्वीट
“साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?? साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र” असे ट्वीट निलेश राणे यांनी 15 मे रोजी केले होते.
साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??
साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र https://t.co/jQ02FOLjvb
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 15, 2020
रोहित पवार यांनी दिलेले उत्तर
“मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.” असे ट्वीट रोहित पवार यांनी 16 मे रोजी केले होते.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
निलेश राणे यांचे दुसरे ट्वीट
“मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुमच्यासाठी चांगली आहे, तुम्हाला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली??? मतदारसंघावर लक्ष द्या सगळीकडे नाक टाकू नका, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी” अशा आशयाचे ट्वीट निलेश राणे यांनी रोहित पवारांना उत्तर देण्यासाठी केले.
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
रोहित पवरांचं ट्विट
“आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निलेश राणे यांना दिलेल्या उत्तरावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.
निलेश राणेंचं प्रत्युत्तर
“बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुमचं काम माहीत आहे मला, बोलत राहिलात तर त्याचा पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तुम्हाला” असे एकेरी भाषेतील ट्वीट निलेश राणे यांनी प्रत्युत्तर म्हणून केले.
बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला. https://t.co/TzfkkGo6q6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 19, 2020
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल