पाच वर्षात नेत्यांची संपत्ती दुप्पट होते हे सर्वांनी ऐकलय. पण तुम्ही कधी असं ऐकलय का? पाच वर्षात नेत्याचं वय 7 वर्षांनी वाढलं?. पाच वर्षात वय 5 वर्षांनी वाढलं पाहिजे. पण ते 7 वर्षांनी वाढलं असेल तर?. खरच असं झालय. झारखंडमध्ये असं घडलय. ते सुद्धा कुठल्या सर्वसामान्य माणसासोबत नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बाबतीत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 2019 साली दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात वय 42 असल्याच सांगितलं होतं. पण यावेळच्या उमेदवारी अर्जात त्यांचं वय 49 वर्ष आहे. म्हणजे पाच वर्षात मुख्यमंत्री हेमंत सोरेन 7 वर्षांनी मोठे झाले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बरहेट विधानसभा सीटवरुन सलग दोनदा निवडणूक जिंकली आहे. तिसऱ्यांदा त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. हेमंत सोरेन यांच्या वयाबाबत बरहेटमधील भाजपा उमेदवार गमालियल हेम्ब्रम यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. भाजपाने सीएम हेमंत सोरेन यांच्या उमेदवारी अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. हेमंत सोरेन यांचं कुठल वय खरं आहे? असा प्रश्न भाजपाकडून विचारला जातोय.
कुठलं बरोबर होतं आणि कुठलं चुकीचं?
उमेदवारी अर्ज दाखल करताना सीएम हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या शपथ पत्रात कुठलं बरोबर होतं आणि कुठलं चुकीचं?. 2024 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील वय योग्य असेल, तर 2019 मध्ये दाखल केलेल्या शपथ पत्रातील वय चुकीच का सांगितलं? ते उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या वयावरुन आता झारखंडमध्ये नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या साईटवर दाखल केलेलं उमेदवाराच एफिडेविट पाहिलं, तर हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या एफिडेविट फॉर्म 26 (पार्ट -A ) मध्ये स्पष्ट लिहिलय. 2019 च्या अर्जातील वय 42 आणि 2024 च्या अर्जात वय 49 दाखवलय.