“जितेंद्र आव्हाड यांच्या नसानसात हिंदू द्वेष भरलेला आहे. आमच्या मनात मुस्लिम द्वेष नाही. बांग्लादेशी याचा फायदा घेत असतील आणि ते मुस्लिम असतील तर यात माझा काय फायदा? जितेंद्र आव्हाड ठेकेदार असल्यासारखे काय बोलतात?” अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. “देशाच्या सैन्यात हिंदू जास्त आहेत. कुठल्याही प्रसंगात हिंदू जास्त बळी पडतात. त्यामुळे या देशातील साधनसंपत्तीवर हिंदूचा वाटा जास्त असला पाहिजे” असं प्रकाश महाजन म्हणाले.
“जितेंद्र आव्हाड हे काहीही बोलून राजकीय पोळी भाजून घेतात. माँ माळी, बाप तेली, बेटा निकला सय्यद आली या वक्तव्यावर मी जाहीर माफी मागतो, कुणाचे मन दुखावले असेल तर हृद्यपूर्वक माफी मागतो” असं प्रकाश महाजन म्हणाले. ‘हा मुद्दा संजय राऊत यांनी उचलावा याचं मला आश्चर्य वाटतं’ असं प्रकाश महाजन म्हणाले.
‘राऊत आपल्या ड्रेनेजचे झाकण उघडं ठेऊन बोलतो’
“रोज सकाळी आपल्या ड्रेनेजचे झाकण उघडं ठेऊन संजय राऊत बोलत असतो. माझ्या नेत्याला सुपारी बाज बोलतो आणि आम्ही एखादी म्हण वापरली तर आम्हाला बोलतात. संजय राऊत म्हणजे लोक सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण” अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.