आर्थिक पॅकेजवरून फडणवीस, आव्हाडांची जुंपली, नेटकऱ्यांचीही वादात उडी

| Updated on: Apr 03, 2021 | 7:15 PM

कोरोना संकटात जनतेला आर्थिक पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुपंली आहे. (jitendra awhad criticised devendra fadnavis over lockdown package)

आर्थिक पॅकेजवरून फडणवीस, आव्हाडांची जुंपली, नेटकऱ्यांचीही वादात उडी
jitendra awhad-devendra fadnavis
Follow us on

मुंबई: कोरोना संकटात जनतेला आर्थिक पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुपंली आहे. या दोन नेत्यांमध्ये पॅकेजच्या या मुद्द्यावरुन वाद सुरू असतानाच नेटकऱ्यांनीही या वादात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी थेट फडणवीसांनाच टार्गेट केलं असून त्यांना राज्यात नव्हे देशातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासह अनेक आश्चर्यकारक सल्ले दिले आहेत. (jitendra awhad criticised devendra fadnavis over lockdown package)

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन, निर्बंध लागू केले आहेत. ते लागू करताना या देशांनी आर्थिक पॅकेजही जाहीर केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी या देशांच्या नावांसहीत पॅकेजची माहितीही दिली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही फडणवीसांना जोरदार उत्तर दिलं आहे. तर नेटकऱ्यांनी फडणवीसांच्या या फेसबुक पोस्टची खिल्ली उडवली आहे.

काय आहे फडणवीसांची पोस्ट?

फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला. पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्यात आलं. पण, युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला. डेन्मार्कमध्येही तिच परिस्थिती. पण, एप्रिल 2020 मध्येच डेन्मार्कमध्ये सर्वच घटकांना पॅकेज देण्यात आलं. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास येत आहेत. पण निर्बंध उठवताना त्यांनी 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत केली. एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत देण्यात आली. बेल्जियमनेही परत लॉकडाऊन केलाय. पण, त्या आधी बेल्जियमने 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे. हे करताना त्यांनी 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले होते. आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत. पण आयर्लंडमध्ये 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच जाहीर करण्यात आलंय. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत. तिथेही 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच देण्यात आलं. युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा, असं फडणवीस यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तर, विरोधक वा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आव्हाडांचा सणसणीत टोला

फडणवीस यांच्या पोस्टवर आव्हाडांनी सणसणीत टोला हाणला आहे. पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारांनी केलं आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याच्या हक्काचे पैसे देत नाही. बघा काय मिळते का तुमचे वजन वापरून, असा चिमटा आव्हाडांनी फडणवीसांना काढला आहे. (jitendra awhad criticised devendra fadnavis over lockdown package)

 

नेटकऱ्यांकडून खिल्ली

फडणवीसांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. तसेच फडणवीसांना अनेक सल्लेही दिले आहेत. एका नेटकऱ्याने तर आता देशातच राष्ट्रपती राजवट लागू करा, असा सल्ला फडणवीसांना दिला आहे. एकाने तर मोदी सरकारला असा जबरदस्त टोला कोणीच मारला नव्हता, बघू काय फरक पडतो का? अशी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही सत्तेसाठी वेडे झाले आहात. तुमची मागणी योग्य आहे. पण ती चुकीच्या ठिकाणी मांडत आहात. केंद्र सरकारने पॅकेज दिले पाहिजे आणि तुम्ही राज्य सरकारकडे मागत आहात, असं एक नेटकरी म्हणतो. दुसऱ्याने तर मोदींना पॅकेज जाहीर करायला सांगण्याची विनंती केली आहे. साहेब, हे सगळे देश आहेत. आपल्या केंद्राने राज्याला केलेली मदत दाखवा. काहीही ठोकू नका, मोदी अडचणीत येतील, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. (jitendra awhad criticised devendra fadnavis over lockdown package)

संबंधित बातम्या:

मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली?; आता काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

काँग्रेसचे नाराज नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राष्ट्रवादीचे आव्हाड म्हणाले, संजय राऊत कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात

मुख्यमंत्री हतबल, कुटुंबही सुरक्षित ठेवू शकले नाहीत; प्रवीण दरेकरांची टीका

मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसात कठोर निर्णय, आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात?

(jitendra awhad criticised devendra fadnavis over lockdown package)