मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला. (jitendra awhad slams devendra fadnavis over correct karyakram word)
जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी करेक्ट कार्यक्रम या शब्दावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. पंढरपूरच्या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द वापरला. पण हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. तो कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहेच, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांची निवडणूक प्रचार बंदी लावण्यात आली आहे. त्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप नेहमीच मतांचं ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले.
नोकरदार महिलांसाठी वसतिगृह
ताडदेव येथे 1000 नोकरदार महिलांची राहण्याची व्यवस्था होईल असं सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत आहे. नोकरदार महिलांसाठीचंच हे वसतिगृह असणार असून येत्या दीड ते दोन वर्षात हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहासाठी 35 कोटी खर्च येणार असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असं हे हॉस्टेल असणार आहे, असं आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार हे वसितगृह उभारण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
म्हाडा जबाबदारी घेणार
मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. म्हाडा कोरोना काळात कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार आहे. लोकांना वाचवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी जेजे हवे ते करू, असंही ते म्हणाले.
लॉटरी विजेत्यांना अतिरिक्त रक्कम नाहीच
लॉटरी विजेत्यांना कुठलीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. म्हाडाने तो निर्णय परस्पर घेतला होता. तो आम्ही अमान्य करतो, असंही ते म्हणाले. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीस काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला होता. (jitendra awhad slams devendra fadnavis over correct karyakram word)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 13 April 2021 https://t.co/qWvY8s9euF | #SuperFast100News | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनाबाधितांवर उपचार करणारा डॉक्टर फक्त बारावी पास, पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर
महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती, राज्य लॉकडाऊनच्या वाटेवर, राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी मुकर्रर केलेल्या तारखेलाही शुभेच्छा; राऊतांचा खोचक टोला
(jitendra awhad slams devendra fadnavis over correct karyakram word)