नवी दिल्ली : बिहार पाठोपाठ आणखी एका राज्यात सत्ता पालटाची भिती आहे. कालच जमीन घोटाळा प्रकरणात हेमंत सोरेन यांची ईडीने चौकशी केली. आज झारखंड मुक्ति मोर्चाने मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली आहे. जेएमएम प्रवक्त मनोज पांडेय यांनी ही माहिती दिली. “हेमंत सोरेन पळपुटे नाहीत. मुख्यमंत्री लवकरच आपल्यामध्ये असतील. ते कुठे आहेत? हे आम्ही नाही सांगू शकत. ही आमची रणनिती आहे” असं JMM चे प्रवक्ते मनोज पांडेय यांनी सांगितलं.
‘पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत’, असं जेएमएस प्रवक्त्याने सांगितलं. “निवडलेल्या सरकारला ऑपरेशन लोटसपासून वाचवायच आहे. झारखंडला वाचवायच आहे. आदिवासी असणं गुन्हा आहे का?. ते पळपुटे नाहीत. इतकी अस्वस्थतता का आहे? हा आदिवासींचा अपमान आहे. पूर्ण झारखंडचा अपमान आहे. मुख्यमंत्री लवकरच आपल्यामध्ये असतील” असं मनोज पांडेय म्हणाले.
सीएम हाऊसमध्ये आमदार बॅग आणि लेगजसह येणार
हेमंत सोरेन यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांची बैठक होईल. स्वत: मुख्यमंत्री हेमंत सोरेन या बैठकीच अध्यक्षपद भूषवतील. आमदारांची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी सीएम हाऊसमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएम हाऊसमधील बैठकीत आमदार बॅग आणि लेगजसह येतील. काँग्रेस आमदारांची बैठक सकाळी 11 वाजता होईल. मुख्यमंत्री निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक दुपारी 2 वाजल्यानंतर होईल.
चौकशी का सुरु आहे?
महाआघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस आमदारांची बैठक झारखंड प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या बैठकीत विद्यमान राजकीय परिस्थिती आणि राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुख्य एजेंडा असेल. जमीन घोटाळा ते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या टीमकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरु आहे.