मुंबई : कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli) शहरात महापालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुकांनी निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी करण्यास सुरूवात केलीयं. प्रस्थापित नगरसेवकही परत एकदा आपला करिश्मा दाखवण्यासाठी निवडणूकीच्या कामाला लागले आहेत. निवडणूकीतील (Election) आरक्षण जाहिर झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्रही सुरूयं. प्रस्थापित नगरसेवक आपण केलेल्या कामाची जाहिरबाजी करण्यात व्यस्थ असून इच्छुकही प्रभागामध्ये (Ward) कोपर सभा घेताना दिसत आहेत. मात्र, यंदा आरक्षणामुळे अनेकांचे राजकिय गणित बिघडल्याचे चित्र बघायला मिळते आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रभाग क्रमांक नऊची निवडणूक दरवेळीच जोरदार ठरते. यंदाही निवडणूक चर्चेत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. या 133 नगरसेवकांना परत एकदा निवडून येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्कीच आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकून 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15,18 762 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची संख्या 1,50,171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय शहराच्या विकासासाठी घेण्यात आले आहेत.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
प्रभाग क्रमांक 9 मध्ये 31026 लोकसंख्या आहे. भाग क्रमांक 9 च्या उपेक्षा भोईर या नगरसेविका असून त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक लढवली होती. जोशीबाग, आझादनगर, रामबाग, रामबाग खडक, गणपती मंदिर परिसर, संतोषी माता रोड, कर्णिक रोड, तेजश्री बिल्डींग, यशवंतराव चव्हाण मैदान, हॉलीक्रॉस शाळा व लुड्स शाळा परिसर पुढे गौर काळु भोईर, पवार व दया पाटील यांचे घर पुढे होळी चौकातून विकणघर रोडने मंगेशी सहारा सोसायटी छत्री बंगला घेऊन संदिप हॉटेल चौकापर्यंत वाॅर्ड आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
उत्तरेला काळी मस्जीद रस्त्याने चिकणघर नाल्यापासुन बकाला सोसायटी, राजेश्वरी सोसायटी, यशोकुंज सोसायटी घेऊन रामबाग लेन नं. 4 सह पुढे जोंधळे पार्क भरत भोईर पार्क क्र. 5. प्रगतीनगर चाळी, सब रिजस्ट्रेशन ऑफिस घेऊन पुढे मोठा म्हसोबा मैदानातुन पोर्णिमा सोसायटी, कामिनी अपार्टमेंट, अम्मु आर्केड घेऊन ठाणगेवाडी चौका पर्यंत. पूर्व ठाणगेवाडी चौकापासून सीमा सोसायटी, रामचंद्र अपार्टमेंट घेऊन संतोषी माता रस्ता ओलांडुन राणी लक्ष्मीबाई उद्यान, पोलिस वसाहत, पोलिस उपायुक्त निवास स्थान घेऊन मुरबाड रोड ओलांडुन वैष्णवी हॉस्पीटल, बॉयलेट अपार्टमेंट घेऊन मध्य रेल्वे हद्दी पर्यंत.