बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजपला सत्तेतून जावे लागणार आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होताना दिसत आहे. गेल्यावेळी १०४ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत ६९ जागांवरच आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसने १२८ जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु कर्नाटकातील २० जागांमुळे चित्र कधी बदलण्याची शक्यता आहे.
२० जागा ठरवणार चित्र
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. परंतु या आघाडीतील २० जागा अशा आहे की त्याठिकाणी मतांचा फरक हजार किंवा त्यापेक्षाही कमी आहे. यामुळे या जागेवरील चित्र कधीही बदलण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या बहुमतात असणाऱ्या काँग्रेस बहुमतापासून दूर जाऊन पुन्हा सत्तेची सूत्र जनता दल सेक्यूलरकडे जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अलर्ट
कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस अलर्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी आपले आमदार सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी ऑपरेशन हस्था सुरु केले आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. या ऑपरेशनुसार विजयी उमेदवारांना काऊंटिंग सेंटरवरूनच हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या विजयी आमदारांची बैठक होणार आहे. त्यावेळी हे सर्व आमदार हजर राहणार आहेत.
काँग्रेसला चांगलाच फायदा
2018च्या निवडणुकीत 104 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळी भाजपला केवळ 68 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे भाजपला जवळपास 30 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. काँग्रेसला गेल्यावेळी 80 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला 127 जागा मिळताना दिसत आहेत.