Congress : ‘या’ कारणासाठी बड्या काँग्रेस नेत्याने जागीच कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली, VIDEO व्हायरल

| Updated on: May 06, 2024 | 8:02 AM

Congress : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. वेगवेगळ्या राज्यात जोरदार प्रचार सुरु आहे. नेते आणि कार्यकर्ते जास्तीत जास्त संपर्कात येण्याचा हा काळ आहे. नेत्याने कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवला की, कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारतो. पण तेच कार्यकर्त्याने केलं, तर मात्र चालत नाही. प्रचारादरम्यान असच एक चित्र दिसून आलं.

Congress : या कारणासाठी बड्या काँग्रेस नेत्याने जागीच कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली, VIDEO व्हायरल
Congress leader slap party worker
Follow us on

नेत्याने कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवला, आपुलकीने विचारपूस केली की, कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारतो. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु आहे. सर्वपक्षीय नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. नेते आणि कार्यकर्ते जास्तीत जास्त संपर्कात येण्याचा हा काळ आहे. प्रचाराच्या निमित्ताने गाठीभेटी होतात, तेव्हा नेत्याच्या अधिक जवळ जाण्याचा, त्यांचा विश्वास संपादन करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. नेत्याने कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला चालतो, पण तेच कार्यकर्त्याने केलं, तर मात्र चालत नाही, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असच एक चित्र दिसून आलं. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली. कानाखाली मारतानाचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

एका प्रचार कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते डीके, डीकेच्या घोषणा देत होते. डीके शिवकुमार तिथे पोहोचल्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, लगेच शिवकुमार यांना राग आला. ते नाराज झाले, त्यांनी तिथेच कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली. व्हायरल व्हिडिओमध्ये हे दिसतय.

त्या कार्यकर्त्याच नाव काय?

भाजपा नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ टि्वट करुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हावेरीच्या सावनूर शहरात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नगर परिषदेचे सदस्य अलाउद्दीन मनियार यांच्या कानाखाली मारली. डीके शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण करण्याची ही पहिली वेळ नाहीय” असं मालवीय यांनी टि्वटमध्ये लिहिलं आहे.


‘स्वाभिमान नाही का?’

“त्याचा गुन्हा काय होता? डीके शिवकुमार कारमधून बाहेर पडले होते, त्यावेळी त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. मला आश्चर्य वाटतं, काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेससाठी काम का करायचय? त्यांचे नेते त्यांच्या कानाखाली मारतात, त्यांचा अपमान करतात. निवडणूक लढवण्यासाठी त्यांना तिकिट देत नाहीत. स्वाभिमान नाही का?” असं अमित मालवीय यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.