बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे. महाराष्ट्राच्या द्दष्टीने सीमावर्ती भागातील निकाल महत्वाचे होते. परंतु सीमावर्ती भागात न शिवसेना ठाकरे गटाचा करिश्मा चालला नाही अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचीही जादू चालली नाही. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव झाला.
राष्ट्रवादीला नाकारले
राष्ट्रवादीकडून ही निवडणूक गंभीरतेने घेतल्याचे दिसले नाही. शरद पवारांसारखा नेता असूनही त्यांनी कर्नाटकात निपाणी वगळता कोठेही प्रचार केल्याचे दिसले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार पुढीलप्रमाणे होते. १. निपाणी (बेळगाव) – उत्तमराव पाटील२. जेवर हिप्पारगी (विजापूर) – मन्सूर साहेब बिलाही ३. बसवन बागेवाडी (विजापूर) – जमीर अहमद इनामदार ४. नागथन (विजापूर) – कुलप्पा चव्हाण ५. येलबर्गा (कोप्पल) – हरी आर ६. रानबेन्नूर (हवेरी) – आर. शंकर ७. हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर) – सुगुना के ८. विराजपेट (कोडोगो) – एस. वाय. एम. मसूद फौजदार ९. नरसिंहराज (मैसूर) – रेहाना बानो
महाराष्ट्र एकीकऱण समितीचे सर्व उमेदवार पराभूत