बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने पहिल्या कलात 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 82 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. सीमाभागात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
सीमाभागात काँग्रेस
महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या सीमाभागाकडे लागले आहे. या भागात प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला होता. परंतु सध्यातरी सीमाभागत काँग्रेसने तीन जागांवर आघाडी घेतली. भाजप १ तर राष्ट्रवादी काँग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यात आल्या. त्यानंतर अवघ्या 45 मिनिटातच पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. या कलामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. जेडीयुला या निवडणुकीत फटका बसला आहे.
प्रतिष्ठेची निवडणूक
भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. पंतप्रधान मोदी यांनी तर बजरंग बलीचा नाराही दिला होता. मात्र, असं असतानाही कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडील फक्त कर्नाटक राज्यातच भाजपचं सरकार आहे. या राज्यातून सत्ता गेली तर भाजपचं दक्षिण भारतातून उच्चाटन होईल असं चित्र आहे.
बेळगाव उत्तर
काँग्रेस- अशिफ राजू शेठ. १६३५
भाजप- रवी पाटील ३५६० आघाडीवर
नागठाण मतदारसंघ
विठ्ठल कटकदोंड काँग्रेस 4164
देवानंद चव्हाण JDS – 2190
इंडी मतदारसंघ
यशवंतरायगौडा पाटील (काँग्रेस) 6538.
बी.डी. पाटील (Jds) 2175
कासूगौडा बिरादार (भाजपा) 1809