कराड, सातारा : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पोलिसांनी कराडमध्ये (Karad) उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) कोल्हापूरला (Kolhapur) निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर सोमय्यांविरुद्ध दुसरा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. किरीट सोमय्यांनी दुसरा 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर आता आपण 50 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.
येवला
– झेंडूच्या फुलांना बाजार भाव नसल्याने संतप्त शेतकऱ्यांने फेकली झेंडूची फुले
– नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील मुखेड फाट्यावरील रस्त्याच्या कडेला झेंडूचा ढिगार
– शेतीमालाला बाजार भाव नसल्याने टोमॅटोचा लाल चिखल, मिरचीचा ठसका, पपईचा चुरडा झाल्याची घटना ताजी असताना आता झेंडूचा ढिगार पहावयास मिळतो
– राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे भुजबळांच्या मतदार संघात शेतकऱ्यांचे चाललं तरी काय आहे ? याकडे लक्ष द्या
– भाजपच्या पुणे जिल्हा ओबीसी मोर्चाकडून किरीट सोमय्या यांचा सत्कार,
– पुण्यातील नऱ्हे गावातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून सोमय्या यांचा सत्कार,
– यावेळी खडकवासलाचे भाजप आमदार भीमराव तापकीरही उपस्थित,
– भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सागर भूमकरांच्या निवासस्थानी सत्काराचे आयोजन,
किरीट सोमय्या ब्रिलियंट आहेत, त्यांनी सुंदर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी राणेंचं उदाहरण दिलं. आम्ही कोणाला सोडलं नाही, अजित पवारांच्या सिंचनाच्या सगळ्या केस सुरु आहेत, काय कुणाला सोडलेलं नाही, तुम्ही काळजी करु नका
महाविकास आघाडीत समन्वय नाही, मुश्रीफांवर कारवाई झालीय, आता कोल्हापुरातील काँग्रेस नेते बंटी पाटील का बोलत नाहीत? सगळे एकमेकांची मजा बघत आहेत. समन्वय नाही तरी सरकार चालतंय, नशीब आहे त्यांचं.
हसन मुश्रीफांना काही ऑफर नव्हती. ऑफर होती आणि त्यांनी मेरिटवर नाकारली तर त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी ड्रामा बंद करावा, चार जण यायचं आणि टीव्ही 9 वर यायचं आणि चप्पल दाखवायचं हे बंद करायचं.
कायद्याची लढाई कायद्याने लढा, ईडीची नोटीस निघेल, माझी हुशारी आहे, मला ज्ञान आहे, त्यामुळे मी सांगतो नोटीस निघेल.
ईडीची चौकशी माहिती देणं, माहिती देणं आणि अनिल देशमुख यांच्यासारखं गायब होणं.
हसन मुश्रीफांच्या २५-३० हजार कार्यकर्त्यांनी सोमय्यांनी दगडफेक केली तर महागात पडेल. तो मार्ग योग्य नाही. ईडीला उत्तरं द्या
किरीट सोमय्या ब्रिलियंट आहेत, त्यांनी सुंदर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी राणेंचं उदाहरण दिलं. आम्ही कोणाला सोडलं नाही, अजित पवारांच्या सिंचनाच्या सगळ्या केस सुरु आहेत, काय कुणाला सोडलेलं नाही, तुम्ही काळजी करु नका
Chandrakant Patil : शरद पवार अशा कोणत्याही गोष्टींना पाठिशी घालणार नाहीत, चुकीच्या गोष्टींच्या मागे उभे राहणार नाहीत, त्यांना माहितीय मुश्रीफांच्या चुकीच्या एण्ट्री झालेत, त्यामुळे पवारांनी हात काढल्यामुळे मुश्रीफ कदाचित अॅडमिट झाले असतील.
येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन मोठ्या नावांचे विषय बाहेर येणार आहेत.
आमच्या रडारवर जावई नाहीत, घोटाळे, भ्रष्टाचार, अन्याय आहेत. नवाब मलिकांचे जावई, एकनाथ खडसेंचे जावई, अनिल देशमुखांचे जावई आणि आता हसन मुश्रीफांच्या जावयावर आरोप आहे.
सिस्टिम मोडून काम सुरु आहे. झेड सिक्युरिटी असलेल्या खासदाराला तुम्ही कसं काय रोखू शकता? गणपती विसर्जनाला जावू देत नाही हे कसं शक्य आहे?
माननीय उद्धवजी गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नका हे मी म्हटलं होतं, हा जो पैशाचा नाच चाललाय तो गृहखात्याच्या माध्यमातून सुरु आहे. चार पोलिसांना भेटा तुम्ही, सगळं बाहेर येईल.
नारायण राणेंच्या बाबतीत काय झालं? दोन मिनिटात जामीन मिळाला, या सरकारला कोर्टात फटके खाण्याची सवय झालीय.
किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यावर मुश्रीफांनी उत्तर द्यावं, तिसरा आरोप जो करणार आहेत, तो सुद्धा गंभीर आहे. मुश्रीफांनी पॅनिक होऊ नये, शांतपणे सामोरं जावं.
किरीट सोमय्यांना धोका आहे हे कोल्हापूर प्रशासनाला समजला, तो त्यांनी केंद्राल का नाही कळवला?
दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नावावर खुलासा होईल, केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच नाही, दोन दिवसात कळेल
कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने नको, कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोपं, ईडीला फेस करणं अवघड, तोंडाला फेस येईल, कारखान्यांमध्ये ९८ कोटी ज्या कंपन्यांमधून आल्या त्या कंपन्या कुठे आहेत? सेनापती घोरपडेंच्या कारखआन्यात देशातील कंपन्यांनी कशी गुंतवणूक केली हे सांगा.
मुश्रीफ साहेब पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्याने काम करायंच असतं.
तुम्ही आरोप करता कोल्हापुरात, पश्चिम महाराष्ट्रात भाजप भुईसपाट झालो. तर कोल्हापूरच फक्त पश्चिम महाराष्ट्रता नाही. सोलापुरात २ आमदार होते आता आमचे ८ आमदार आहेत, दोन्ही खासदार भाजपचे, कोल्हापुरात दोन्ही खासदार युतीचे, साताऱ्यात दोन आमदार, पुणे, पिंपरी मनपा भाजप, सांगली जिल्हा परिषद, स्थायी समिती भाजपची, कोल्हापूर झेडपी आमच्याकडे होती, तीन पक्ष एकत्र आल्याने ती गेली. २०१४ ला तुमचे दोन आणि काँग्रेस शून्य होता, त्यावेळी युतीचे दहा पैकी ८ आमदार होते मुश्रीफ महाशय, त्यामुळे इंदिरा गांधींनीही शेकी मिरवायची नसते.
मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही, मित्र म्हणून गोळीचे पैसे वाचवणं माझं काम,
PWD मध्ये ते म्हणतात घोटाळा, जर घोटाळा झाला असेल तर इतके दिवस झोपले होता का, आम्ही एक एक टेंडर दहा दहा वेळा तपासून काम उत्तम केलं. जर तुम्हाला घोटाळा झाला वाटतो तर तो बाहेर काढा, माझं नाव घेऊन झोप लागत असेल तर परवानगी आहे.
कायद्याची लढाई कायद्याने लढा, गुद्द्यावर येऊ नका. किरीट सोमय्यांनी खासदार भावना गवळींवर आरोप केले, शिवसैनिकांनी दगडफेक केली, पण तिकडे जिल्हाबंदी केली नाही, सांगलीत सोमय्या गेले तिथे जिल्हाबंदी नाही, आताच मुश्रीफांच्या जिल्ह्यात बंदी का?
तुम्ही ९८ कोटींचा हिशेब द्या, ईडीला उत्तरं द्या, सोमय्यांनी माहिती दिली ती माहिती चुकीची आहे हे सांगा, इन्कम टॅक्सने धाड टाकली तेव्हा लोक आणून बसवले दारात, आता किरीट सोमय्या येणार तर २५ हजार लोक येणार असा दावा केला, पण कायद्याची लढाई कायद्याने लढा
किरीट सोमय्यांना मी स्वत: कारखाना दाखवतो, त्यानंतर दावा दाखल करावा, सोबतच दावा दाखल करावा. किरीट सोमय्यांच्या खबरदारीसाठी त्यांना कलेक्टरांनी नोटीस दिली.
कोल्हापूर जिल्हा एकवटला आहे, त्यामुळे सोमय्यांना काही होऊ नये म्हणून जिल्हाबंदी केला.
सोमय्या स्वत: सांगतात, मी फडणवीसांकडे कागदपत्र घेऊन जातो आणि त्यानंतर फडणवीस सांगतात कोणाचा घोटाळा बाहेर काढायचा.
सोमय्यांनी सत्य बाहेर काढावं आम्ही स्वागत करु, मात्र बेछुट आरोप सहन करणार नाही
Hasan Mushrif : शिवसेना आणि आमचं फेव्हिकालचं नातं, दिवार तुटणार नाही. भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, ते या प्रयत्नात यशस्वी ठरणार नाही.
किरीट सोमय्यांनी माहिती घेऊन आरोप करावे, दहा वर्ष झाले या कारखान्याचं कर्ज फेडून.. खोटं बोल पण रेटून बोल असं सोमय्यांचं सुरु आहे. मी सोमय्यांना सांगेन, तुम्हालाही मुलं बाळं आहेत, चुकीचे आरोप करु नका.
आरोप करायचं आणि पर्यटनाला जायचं हे सोमय्यांनी बंद करावं, माझ्या प्रेमापोटी लोक जमले होते, पण मी पत्रक काढून सोमय्यांना निमंत्रण दिलं, या आणि कारखाना बघा, लोकांशी बोला तुम्हाला हसन मुश्रीफ कळेल.
सोमय्यांना रोखण्याचा निर्णय माझा नाही, कलेक्टर, जिल्हा प्रशासन यांचा आहे. माझा कोणताही विरोध नाही
मी १७ वर्षे मंत्री, आजपर्यंत एकही डाग नाही, आता तीन वर्षात मंत्रिपदाला २० वर्षे होतील, महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवारांचं नाव का घेतात? त्यांची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव का घेता? तुरुंगात टाकणार किंवा तशी भाषा करतात, त्यांना हे थांबवावं लागेल, त्यासाठी कोर्टात जाणार
ज्या ज्या खात्यात मी काम केलं, त्या त्या खात्यात चांगलं काम करुन दाखवलं. आम्ही चांगली कामं केली त्यामुळेच लोक माझ्यासाठी जमतात. दहा वर्षापूर्वी साखर कारखान्याचा विषय आता काढला जातोय, कारण का तर मंत्री झाल्यानंतर काहीच मिळत नाही.
चंद्रकांत पाटलांनी घोटाळा केला आहे, मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलंय, आपल्याला आता शांत बसून चालणार नाही, आपल्या सगळ्यांवर हे आरोप करतील, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, लोकशाही मार्गाने सगळं करावं लागेल.
प्रसारमाध्यमांनीही जे योग्य ते दाखवावं. चंद्रकांत पाटलांच्या दबावामुळे हे सुरु आहे. चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती.
अप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीने मुदतीच्या दोन वर्षापूर्वी सोडला, कंपनीला तोटा झाला. नितीन गडकरींचं मार्गदर्शन घेतलं असतं तर सोमय्यांना बरं झालं असते.
मी आधी १०० कोटीचा आणि आता दुसरा ५० कोटीचा फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. दोन अब्रुनुकासनीचे दावे दाखल करणार.
सोमय्यांनी आरोप केले, तक्रार केलेतर मग तुम्ही पर्यटनासाठी तिकडे कशाला जाता? यांना तुरुंगात टाकणार, त्यांना जेलमध्ये टाकणार असं म्हणतात, याविरोधात आम्ही कोर्टात जाणार, हे न्यायाधीश झालेत का/
चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावे, कुणाचा वापर करुन, माझ्या कुटुंबाची बदनामी करुन काही मिळणार नाही, सगळे आरोप खोटे आहेत, मी १०० कोटीचा दावा ठोकणार आहे, तो दावा तयार होत आहे.
आजच्या कथित घोटाळ्याबाबत केलेला आरोप इतका बिनबुडाचा आहे की सोमय्यांची सीएची पदवी शंकास्पद. सोमय्यांनी अभ्यास करावा. मी सीए पाठवतो, ते पाहून घ्या.
मला भाजपमधील नेते सांगतात, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. गरीब आणि सामान्य जीवाभावाचे लोक माझ्यासोबत आहेत.
काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. आज त्यांनी अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत बोलले. मात्र ब्रिक्स इंडिया कंपनी आणि माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नाही.
मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल १ लाख आहे, मग १०० कोटीचा घोटाळा कसा होईळ?
२०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता १० वर्षासाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात २०२० ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता, २०२० मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली.
दोन वर्ष आधीच ४३ कोटीला दहा वर्षापूर्वी घेतला, तोटा होत असल्यामुळे दोन वर्षापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला. २०२० ला कारखाना घेतला न ाही, २०१२-१३ मध्ये राज्य सरकारकडून सहयोगी तत्वावर घेतला, पण नुकसानीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला.
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत., त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी म्हणालो, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे.
चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही
हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद
सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत.
किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी? कोणाला विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न आहे
मी किरीट सोमय्यांचा आभारी आहे, त्यांनी मला तब्बेतीसाठी शुभेच्छा दिला्या. मला डेंग्यू होता आणि अशक्तपणा होता.
किरीट सोमय्यांच्या आरोपामध्ये भाजपचं षडयंत्र आहे. विशेषता चंद्रकांत पाटील हे मास्टरमाईंड आहे.
माझे नेते शरद पवार, महाविकास आघाडी, परमबीर सिंग किंवा केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबद्दल पत्रकार परिषदा घेऊन मी आवाज उठवला. त्यामुळे भाजप नेते मंडळी मला दाबण्याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांना टूल म्हणून भाजपने वापरलं.
संजय राऊत काय म्हणाले?
मोदींच्या सरकारवर देखील आरोप लावेल गेले, किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. त्यांनी आमच्या मंगळावर,चंद्रावर जाऊन पाहणी करवी. लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचे तर करु द्या.
आरोप करणं हे फॅशन झाली आहे. कळेल त्यांना आमचा रंग कोणता आहे. मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं त्याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही.
मुख्यमंत्र्यावर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी खोटे नाटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत.
तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर त्यांच्या यंत्रणांमार्फत प्रेशर करत असतील तर ते योग्य नाही.
याला नाट्य म्हणणं चुकीचं आहे. तो रंगभूमीचा अपमान ठरेल. महाराष्ट्रात मराठी नाटकाला परंपरा आहे. केंद्राच्या पाठबळावर महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. कालची कारवाई गृहमंत्रालयाची आहे.
कोल्हापूर : खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त, भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे उतरवल्यानंतर राजकीय संघर्ष टळला, खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त, महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापूर रेल्वे स्थानकावर येणार होते किरीट सोमय्या
LIVETV- किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद लाईव्ह
हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेता आलं नाही
ठाकरे सरकारने इतिहास रचला, घोटाळेबाजांऐवजी घोटाळे समोर आणणाऱ्यांना अटक करतंय
मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचं आहे, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
ठाकरे सरकारची ठोकशाही, गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, csmt स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला.
मी आदेशाची कॉपी मागितली, त्यात लिहिलं होतं, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला,
त्यावर पोलीस पळून गेले.
माझी मागणी गृहमंत्री वळसेपाटीलांकडे ज्या पोलिसांनी गैर कायदेशीरपद्धतीने ऑर्डर दाखवली, कोल्हापूर पोलिसांची ऑर्डर, कराड पोलिसांनी दिली, या ऑर्डरमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका असं कुठेच नाही. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी स्वीकारणार का? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का?
आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा, मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी
हसन मुश्रीफांच्या चांगल्या आऱोग्यसाठी प्रार्थना करतो.
ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलं, तर माननीय हसन मुश्रीफ हे कागलमध्ये येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी जनसमुदाय दाखल होणार आहे, त्यावेळी किरीट सोमय्या गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची धारणा निर्माण आहे. माझी वळसे पाटलांकडे मागणी आहे, ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे, तर ही गुपीत माहिती कुठून दिली?
ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं, त्याच्याशीही तुमची गद्दारी. तुमच्याकडे जी माहिती आली गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो, ही माहिती तुम्ही सुरक्षा यंत्रणांशी का शेअर केली नाही?
उद्धव ठाकरेंची इच्छा आहे किरीट सोमय्ायंवर हल्ला व्हावा, याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्वावं लागेल.
हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला ncp चे कार्यकर्ते येणार होते की गुंड? की राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का?
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अर्थमंत्रालय, ईडी चेअरमन, इडी डायरेक्टर, सहकार मंत्रालय २७०० पानांची कागदपत्र दिली आहेत. त्यावर चौकशी सुरु झाली आहे. आणखी माहिती ईडीने मागितली आहे, ती माहिती दोन दिवसात देणार आहे. ईडी आणि केंद्राने चौकशी सुरु केली आहे, त्या भीतीने माझ्यावर हल्ला करण्याची भीती होती का
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मला मारण्याचा प्रयत्न केला. एका वाशिममध्ये गेलो, तेव्हा दगडफेक झाली. आता हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांची धमकी. अंबाबाईच्या दर्शनाला मला बंदी आणि मुश्रीफांच्या स्वागताला परवानगी का?
मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का.. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.
मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे २ कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.
मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले.
गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार
मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.
आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार.
सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे सरकार शरद पवार चालवतात. त्यामुळे याची माहिती त्यांना आहे. पवार आणि ठाकरे सरकार चालवतात. गृहमंत्री ncp चे आहेत, मग किरीट सोमय्यांनी जेरबंद कुणी केलं?
२०२० मध्ये हा कारखाना ब्रिक्स इंडिया या कंपनीला देण्यात आला. सहकार मंत्रालयाने दिला. ब्रिक्स इंडिया ही बेनामी कंपनी आहे. यामध्ये ९८ टक्के शेअर कॅपिटल कलकत्त्याच्या शेल कंपन्यांतून आले. यामध्ये दोनच पारदर्शक शेअरधारक आहेत १-१ टक्क्यांचे ते हसन मुश्रीफ यांचे जावई.
ब्रिक्स आणि सरसेनापती कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झालेत. हे व्यवहार अपारदर्शी आहेत. हे लिलाव कोणत्या पद्धतीने झाले, किती लिलावात सहभागी झाले हे सर्व अपारदर्शी आहेत.
मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे,. तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला मा. उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे
३० तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार. मला रोखणार आहे का?
मुंबई पोलिसांना मी लिगली विचारलं, त्यामुळे पोलीस पळून गेलं. ठाण्याला पोलीस म्हणाले खाली उतरा, मी म्हटलं आदेश दाखवा. शेवटी साताऱ्यात सीनियर पोलीस आले, डब्यात बसले, त्यांनी मला विनंती केली, कराडमध्ये उतरा. मी त्यांना विचारलं आदेश दाखवा, त्यांनी मला आदेश दाखवला, माझी सही घेतली.
त्यांनी सांगितलं मी म्हटलं विनंती नाही, मी कोल्हापूरला जातो, बॉर्डरवर थांबवा. ते म्हणाले इथे सगळी व्यवस्था केली आहे, माझं भांडण यांच्याशी नाही. मी कायदा सुव्यवस्थेचं पालन करायला तयार होतो, पण त्यांनी खोटी ऑर्डर दाखवली. पोलिसांनी मला कराडमध्ये व्यवस्था असल्याचं सांगितलं त्यामुळे मी इथे उतरलो.
हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.
ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो.
मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.
मी माझ्या वकिलाशी बोललो, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आपल्याला कायदेशीर अॅक्शन सुरु करायची आहे. म्हणून कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागणार आहे. मी पुन्हा एकदा कोल्हापूर प्रशासनाला माझा दौरा कळवणार, जेव्हा त्यांना वाटेल ncp कडून धोका आहे, त्याची माहिती झेड कॅटेगरीच्या सोमय्यांच्या सुरक्षा यंत्रणेला देतील, मी फार दिवस थांबणार नाही.
माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीच्या ६ नोटीसच्या धमक्या आल्या आहेत. प्रताप सरनाईक, अनिल परब, जितेंद्र आव्हाडचे वाझे, हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे मुलुंड पोलिसात दादागिरी करुन त्यांच्या एका केसमध्ये माझा मुलगा नील सोमय्या साक्षी म्हणून हवा होता. मला फोन करुन विनंती केली, त्यांची केस अधिक मजबूत होईल. ठाकरे सरकारने अफवा पसरवली नील सोमय्या विरुद्ध चौकशी सुरु झाली.
प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली, प्रो. मेधा सोमय्या यांनी काही घोटाळा केल्याचा आरोप केला. मात्र उद्धव ठाकरे यांना सवय आहे धमक्या देण्याची मात्र मी धमक्यांना घाबरणार नाही.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. “किरीट सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात. कोणाच्याही जागेकडे बोट दाखवून बेनामी म्हणतात म्हणून जनतेत भीती आहे. याचकरिता बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या असतानाही त्यांचे काम भाजपा करणार का? सोमय्यांनी नौटंकी कायद्याच्या चौकटीत करावी”, असं सचिन सावंत म्हणाले.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. सकाळी 10 वाजता सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
किरीट सोमय्यांच्या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. हसन मुश्रीफ आज सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हसन मुश्रीफ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडतील. हसन मुश्रीफ सध्या मुंबईत असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.