आनंदराव अडसूळ अटक होताच आजारी पडले! हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकत नाही- किरीट सोमय्या

| Updated on: Sep 27, 2021 | 2:18 PM

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टोला लगावलाय. ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे.

आनंदराव अडसूळ अटक होताच आजारी पडले! हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकत नाही- किरीट सोमय्या
आनंदराव अडसूळ, हसन मुश्रीफ
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली. त्यानंतर त्यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टोला लगावलाय. ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे. (Kirit Somaiya criticizes Anandrao Adsul, warns Minister Hasan Mushrif)

सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अजकले आहेत. त्याबाबत अडसूळ आणि उद्धव ठाकरे कुणीच उत्तर देत नाही. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. बाप-बेटे मजा मारत आहेत. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली. त्याचं मी स्वागत करतो, अशा शब्दात अडसूळांवरील कारवाईचं सोमय्या यांनी स्वागत केलं आहे.

‘हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही’

ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही सोमय्या यांनी जोरदार हल्ला चढवलाय. हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करणार. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार, असा इशाराच सोमय्या यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलं आहे. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.

आनंदराव अडसूळांची चौकशी

दरम्यान, आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतीय.

‘हिम्मत असेल तर अडवून दाखवा’

सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला आहे.

इतर बातम्या :

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!

मंत्रिपद न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची नाराजी पुन्हा उघड, जयंत पाटलांच्या दौऱ्यात अनुपस्थिती

Kirit Somaiya criticizes Anandrao Adsul, warns Minister Hasan Mushrif