मुंबई : एरवी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर हे जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होतं हे आज अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. मुहूर्त होता लग्न सोहळ्याचा. या लग्न सोहळ्यात किरीट सोमया आणि किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची समोरासमोर भेट झाली. (Kirit Somaiyya shakes hand with Kishori Pednekar)
नील सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी प्रेमाने नील सोमय्या यांना टपली मारली. ऐरवी एकमेकांवर टीका आणि आरोप करणारे नेते जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांची कृती पाहून लोकांना ही नव्वल वाटतं. हे राजकारण आहे. यात काहीही होऊ शकतं असं म्हणूनच म्हटलं जात आहे.
किशोरी पेडणेकर यांनी घुसखोरी करून घराचा ताबा घेतला आहे”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. “दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. आता त्यांना 48 तासांत गाळा रिकामा करावा लागणार आहे. पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले आहेत”, असा देखील गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.