नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या इमरान प्रतापगढींना (Imran Pratapgarhi) काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राज्यसभेचे (rajya sabha) अनेक दावेदार असताना प्रतापगढी यांना काँग्रेसने (congress) महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रतापगढी हे प्रसिद्ध ऊर्दू शायर आहेत. त्यांचा साहित्याशी संबंध आहे असं सांगून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वीही हेच कारण देत उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून राज बब्बर यांचा पत्ता कट करून प्रतापगढींना उमेदवारी दिली होती. आता त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. ज्या कारणासांठी प्रतापगढींना उमेदवारी देण्यात आली आहे, ते कारण खरोखरच संयुक्तिक आहे का? प्रतापगढींची शायरी खरोखरच उच्च दर्जाची आहे का? फैज, फराज आणि राहत इंदौरी सारख्या शायरांच्या दर्जाची त्यांची शायरी आहे का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
इमरान प्रतापगढी यांचे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या हिंदीपट्ट्यात अधिक कार्यक्रम होतात. प्रत्येक मुशायरामध्ये ते सहभागी होतात. मात्र, त्यांच्या शायरी अत्यंत वरवरच्या आहेत. त्याला खोल गर्भित अर्थ नाही. शिवाय या शायरी प्रासंगिक आहेत. टाळ्या खाऊ आहे. त्या ना फैज, ना फराज, ना राहत इंदौरी यांच्या आसपास भटकणारी आहे. या शिवाय केवळ भाजप विरोध हाच त्यांच्या शायरीतून दिसतो. ती सर्वंकष आयाम घेऊन येणारी नाही. त्यामुळे प्रतापगढी यांची शायरी उथळ आणि ड दर्जाची वाटते.
कुर्बान तुझ पर ऐ अबू आसीम….
महज इस बात पर कुर्बान तुझ पर ऐ अबू आसीम
तू अपने साथ गाडी में मुसलमा लेके चलता है
ये पागल अपने लब पे नामे अल्लाह लेके चलता है!!
लहू की बात करता है, कफन की बात करता है,
वो कारोबारीओंके साथ धन की बात करता है
हमारे मुल्क ने कैसा नमुना चुन लिया यारो,
वतन की बात करनी थी, तो मन की बात करता है
महोब्बत के सभी मंजर, बडे खालिसे लगते है,
हकीकत से कहे अल्फाज जालिसे लगते
वे रोहित वेमूला की मौतपर आँसू बहाता है,
मगर उस शख्स के आँसू तो घडियाली से लगते है!!!
दूध ने चाय को हरा डाला, सच ने अन्याय को हरा डाला,
कर दिया ये बिहारने साबित, भैसने गाय को हरा डाला !!
जो कल तक कातिल थे, वो कानून के अब रखवाले है,
और लोगो को लगता है, अच्छे दिन आने वाले है
वो जो अपने छतपर तिरंगा तलक नही फेहराते,
वो मेरे उपर गद्दारी का इल्जाम लगाते,
नागपूर के मुख्यालय पर जिस दिन फहरेगा तिरंगा,
उस दिन से पुरे भारत में कही ना होगा दंगा…
कभी ना होगी बंद अजान, कभी ना होगी बंद अजान,
आरती और अजान से मिलकर बने है हिंदोस्तान,
लम्हे भर की अजान तुझको लगे है गुंडागर्दी,
हमने तेरे गाने घंटो झेले है बेदर्दी,
गायक बाबू बेहद नालायक है तेरा बयान…
चाय चाय करते थे, गाय गाय गाय करते है,
जागे है दलित जबसे, हाय हाय करते है,
के ढाईसाल बाकी है, आने दो जरा उन्नीस,
दिल्ली भी ये कह देगी, बाय बाय करते है