मुंबई: राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून समाधान आवताडे निवडून आले आहेत. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आवताडे यांनी विजय मिळवला. त्यामुळे आवताडे प्रकाशझोतात आले आहेत. कोण आहेत समाधान आवताडे? कशी आहे त्यांची राजकीय कारकिर्द त्यावर टाकलेला हा प्रकाश. (know about Samadhan Awatade’s political Biography)
समाधान आवताडे यांचा जन्म सोलापूरचा. ते 43 वर्षाचे आहेत. त्यांनी राज्यशास्त्र आणि साहित्यात पदवी घेतली आहे. आवताडे यांनी 2014ची निवडणूक शिवसेनेतून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी 2019ची निवडणूकही त्यांनी लढवली. यावेळी ते अपक्ष उमेदवार होते. पण त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या आवताडे यांनी त्यामुळे हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात कामाचा धडाका सुरू ठेवला. उद्घटानं, सांत्वनं आणि लोकांच्या समस्यांवर त्यांच्याशी संपर्क सुरूच ठेवला.
भारत भालके यांचे निधनामुळे मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यामुळे आवताडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही त्यांना उमेदवारी दिली. मागच्या दोन्ही दोन्ही निवडणुकीत ज्या 22 गावांनी मतदान केलं नव्हतं. त्या 22 गावांवर आवताडे यांनी विशेष जोर दिला. या गावांमध्ये सर्वाधिक प्रचार केला. निवडणुकीपूर्वीही त्यांनी या गावांमध्ये सातत्याने कार्यक्रम केले होते. कामं केली होती. त्याचा त्यांना या पोटनिवडणुकीत फायदा झाला.
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं गेल्यावर्षी 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती. भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
>> समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
>> 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
>> आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत
>> मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती
>> आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी (know about Samadhan Awatade’s political Biography)
VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 8 September 2021https://t.co/B0WpClWUL7 | #UddhavThackeray | #sanjayRaut | #BJP | #NarayanRane | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2021
संबंधित बातम्या:
पानटपरी चालक ते मंत्री; गुलाबराव पाटलांबाबत हे माहीत आहे का?
पत्रकार ते आमदार, कशी आहे कपिल पाटील यांची राजकीय वाटचाल?; वाचा सविस्तर!
(know about Samadhan Awatade’s political Biography)