नंदूरबार: ग्रामंपचांयातीच्या निवडणुकीचे (Gram Panchayat Election) निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपने (bjp) आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीची कामगिरीही चांगली होताना दिसत आहे. नंदूरबारमध्ये भाजपने चांगली कामगिरी करत 5 ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. तर काँग्रेसनेही (congress) 6 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. नंदूरबार जिल्ह्यात भाजपचा मंत्री असतानाही भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर दिसत आहे. तर शिंदे गट आणि ठाकरे गटानेही राज्यातील ग्रामपंचायतीत चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे.
नंदूरबारमध्ये भाजपने आतापर्यंत 5 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. काँग्रेसने 6, आणि ठाकरे गटाने 1 ग्रामपंचायत जिंकली आहे. डॉ. विजयकुमार गावित हे भाजपमध्ये आले होते. त्यांना भाजपने मंत्रीपद दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. काँग्रेसचीही ताकद अजूनही कमी झाली नसल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे. कोरोना नंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होत आहे. पहिल्या टप्प्यात चांगली परिस्थिती होती. दुसऱ्या टप्प्यातही निकाल चांगले लागताना दिसत आहे.
राज्यातील 1165 ग्रामंपचायतीचे निकाल लागत आहेत. यापैकी 100 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी भाजपने 23, शिंदे गटाने 14, ठाकरे गटाने 15, काँग्रेसने 9 आणि राष्ट्रवादीने 17 तर इतरांनी 22 जागा जिंकल्या आहेत. भिवंडीत मनसेने खाते खोलले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असली तरी आघाडी आणि युतीचे निकाल पाहिल्यास आघाडीने चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. भाजप युतीला आतापर्यंत 37 तर महाविकास आघाडीला 41 जागा मिळाल्या आहेत.
नागपुरात काँग्रेसने खातं खोललं आहे. नागपुराताली अंभोरा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. या ठिकाणी राजू कुकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. तर नाशिकच्या उंपरपाड्यात विकास आघाडीचा सरपंच झाला आहे.