उलटी गंगा… भाजपच्या नेत्यांचं राष्ट्रवादीत इनकमिंग; कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

| Updated on: Aug 05, 2023 | 11:30 AM

राष्ट्रवादीतं फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटाकडून पर्यायी नेते शोधण्यास सुरवात झाली आहे. सध्या राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर ते अजितदादा गटाकडे गेले.

उलटी गंगा... भाजपच्या नेत्यांचं राष्ट्रवादीत इनकमिंग; कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
suresh ghadge
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर | 5 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात जातील असा सर्वच राजकीय पक्षांचा कयास होता. काही प्रमाणात हा अंदाजही खरा ठरला. पण राष्ट्रवादीतून 40 आमदार गेल्यानंतर अजितदादांकडे येणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. ज्या पद्धतीने शिंदे गटात ठाकरे गटाकडून येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे, त्याप्रमाणे शरद पवार गटातून येणाऱ्यांचा ओघ अजितदादा गटाकडे दिसत नाहीये. मात्र, भाजपचे नेतेच शरद पवार गटात येत असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापुरातील एका बड्या नेत्याने शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता उलटी गंगा वाहू लागली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं जाहीर केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायी नेत्यांना जोडायला सुरवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील चंदगड येथील भाजपचे नेते सुरेश घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. तसेच घाडगे यांच्या प्रवेशाने शरद पवार गट मजबूत झाल्याचंही सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादीतं फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटाकडून पर्यायी नेते शोधण्यास सुरवात झाली आहे. सध्या राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर ते अजितदादा गटाकडे गेले. त्यामुळे चंदगड विधानसभेत शरद पवार गटाकडून आश्वासक चेहऱ्याची पाहणी केली जात होती. सुरेश घाडगे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अनेक कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून पुन्हा नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे.

विधानसभा लढवणार?

पक्ष प्रवेशानंतर सुरेश घाडगे यांनी tv9 मराठीशी संवाद साधला. सत्ता असताना मज्जा घ्यायची आणि नंतर साथ सोडायची ही महाराष्ट्रची संस्कृती नाही. आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची कामे तालुक्यात करणार आहे, अशी प्रतिक्रिया घाडगे यांनी व्यक्त केली. येणाऱ्या विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडून त्याच्या नावाचा ही विचार होऊ शकतो. लवकरच ते मुंबईत शरद पवार यांची भेट घेणार आहेत.