मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर आता देशभरातील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरु केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केलीय. देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही, असं पवार म्हणाले. पवारांच्या या टीकेनंतर केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी शरद पवारांची भेट नाकारली कळतंय. त्यामुळे राजकीय विश्वात चर्चेला उधाण आलं आहे. (Discussion that Union Minister Piyush Goyal refused to meet Sharad Pawar)
आज दुपारी शरद पवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नियोजित भेट होणार होती. पण पियुष गोयल यांनी ऐनवेळी पवारांची भेट नाकारल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, गोयल यांनी पवारांची भेट का नाकारली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण पवार यांनी लखीमपूर हिंसाचारावरुन केंद्र सरकार आणि भाजपवर केलेल्या टीकेनंतर ही भेट नाकारण्यात आल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे.
सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही शुरु आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नाही. उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही. देशातील शेतकरी काही मुद्यांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधात शांततेत आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. हे आंदोलन शांततापूर्णपणे आंदोलन करण्यात येत आहे. 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर यंत्रणेनं तो दडपण्याचा प्रयत्न केला, असं शरद पवार म्हणाले.
लोकशाहीत शांततेत आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचं अधिकारानं लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांनी विशेषत, भाजप सरकारांमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवून दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही शेतकऱ्यांची हत्या झाली, आणखी काही लोकांची हत्या झाली आहे. काही गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार 6 ते 8 शेतकऱ्यांची जबाबदारी दिल्लीतील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
काही लोकांना सत्तेपासून वंचित राहावं लागत आहे. म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. लखीमपूरची घटना आणि जालियनवाला बाग हत्याकांड या दोन्ही वेगळ्या घटना आहे. आणि चौकशी केल्याशिवाय अशाप्रकारची प्रतिक्रिया देणं योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या, ते कोण विसरू शकतो, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पलटवार केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले. अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. नरेंद्र मोदींना त्यांचा पुतण्या किंवा मुलाला आमदार, खासदार बनवायचं नाही. पंतप्रधानांनी देश मेरा परिवार असं सांगितल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. काल जागतिक स्तरावर सगळं डाऊन होतं. पण यांची खुर्ची, यांचं डोकं आणि बुद्धीही डाऊन झालीय, अशी खोचक टीकाही मुनगंटीवार यांनी पवार आणि पटोलेंवर केलीय.
इतर बातम्या :
Discussion that Union Minister Piyush Goyal refused to meet Sharad Pawar