Nawab Malik आणि Anil Deshmukh यांचे वकिल पुढचा निर्णय घेतील – Jayant Patil
मलिक आणि देशमुख यांनी मतदान करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळून लावले आहेत.
मुंबई: राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीवरून (Rajya Sabha elections) जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे. आपले आमदार फुटू नये म्हणून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारकडून काळजी घेतली जात आहे. दरम्यान एका एका आमदाराच्या मतासाठी पक्षाचे नेते आणि पक्षा काम करताना दिसत आहे. तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी करण्यावर भर दिला जात आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मतं कुजणार की काय असा प्रसंग समोर आला आहे. कारण न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी नाकारली आहे. मलिक आणि देशमुख यांनी आपल्याला राज्यसभेच्या निवडणूकीसाठी मतदान करता यावे म्हणून एका दिवसाचा जामिन मिळावा असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले न्यायालयाने दिलेला हा निकाल निराशा जनक आहे. तर न्यायालयाच्या निकालाने त्यांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला असल्याचे ते म्हणाले. तर उच्चन्यायालयात अपिलच्या बाबत मलिक आणि देशमुख यांचे वकिल पुढचा निर्णय घेतील असेही ते म्हणाले