यवतमाळ: शिवसेना (shivsena) सोडून जे गेले त्यांना हरवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. निवडणुकीत (election) विजय आपलाच होईल असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी शिवसैनिकांना दिला. हे संकट म्हणजे आव्हान आहे. यू कॅन विन हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा आणि संघटना मजबूत करण्यासाठी काम करा, असं आवाहनही दानवे यांनी शिवसैनिकांना केलं.
अंबादास दानवे हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आज आपल्या समोर आव्हाने असली तरी शिवसेना ही सामान्य माणसांची आहे. सामान्य माणूस आजही आपल्याशी जोडला गेलेला आहे. जे सोडून गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले त्यांच्या माथी गद्दार हा शिक्का कधीही मिटणार नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यातील कोणते ही प्रश्न असो, कुठेही चुकीची घटना घडली असो तुम्ही मला बोलवा मी येथे येईल तसेच जनसामान्यांचा आवाज बनत तो उठवणार. येणाऱ्या काळात शिवसेना प्रत्येक ठिकाणी पोहचली पाहिजे, असं ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत करण्यासाठी, पक्षवाढीसाठी सर्वांनी जोमाने तयारीला लागा,अशा सूचना त्यांनी यवतमाळ येथील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी हे शिवसेनेच्या पाठीशी उभा असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, उप-जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, गजानन डोमाले, रवी पालगंधे, संजय निखाडे, शरद ठाकरे, बळीराम मुटकुळे,तालुका प्रमुख संजय रंगे, प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, रवी बोडेकर, सतीश नाईक, शहरप्रमुख सुधीर थेरे, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी शहर प्रमुख झरी संजय बिजगुंवार, महागांव शहर प्रमुख तेजस नरवाडे, अभय चौधरी, वाहतूक जिल्हाप्रमुख शैलेश गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, विशाल गणात्रा, विक्रांत चचडा आदी उपस्थित होते.