मुंबई : ‘सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला आहे. ‘उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही’, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेनेचे नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.( Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray )
उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही. सरकारमध्ये ट्रॅफिक सुरुच राहते. या सर्व गोष्टींबद्दल जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन तशा प्रकारचं एक ट्वीटही करण्यात आलं आहे.
उद्धवजी फार चांगली कार चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार.@Dev_Fadnavis pic.twitter.com/yOirLRQOhq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 19, 2021
”मी उत्तम गाडी चालवतो, उत्तम चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही. मास्क घालणे, हात धुणू आणि अंतर ठेवणे ही आपली जीवनशैली आता बनलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
ती जीवनशैली काही वर्ष किंवा महिने तरी आपल्याला अंगीकारावी लागणार आहे. व्हॅक्सिन आल्यानंतरही बूस्टर डोस द्यावे लागलात. तसेच सुरक्षा नियमांचे बुस्टर डोस दिले गेले पाहिजेत, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. विशेष म्हणजे त्याला चंद्रकांत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, शिवसेना त्या तिघांमध्ये गेल्यानंतरही जनतेनं भाजपलाच प्राधान्य दिलंय. हे जर उद्धवजींना कळलं असतं. तर मग हे सरकार आलं नसतं, असंसुद्धा चंद्रकांत पाटील म्हणालेत.
संबंधित बातम्या :
कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, संजय राऊतांची कबुली
Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray