नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा (Assembly Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी कधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. नेमक्या कोणत्या राज्यात कधी आणि केव्हा निवडणुका होणार आहेत, त्याचं संपूर्ण वेळापत्रक (Full Election Schedule) काय आहे, हे आता स्पष्ट झालंय.
14 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – 7 टप्प्या
कधी कधी मतदान? – 10 फेब्रुवारी , 14फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – दोन टप्प्यात
कधी मतदान? – 27 फेब्रुवारी, 3 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
मे महिन्यात उत्तर प्रदेश सरकारचा (Government) कार्यकाळ समाप्त होतो आहे. तर गोवा सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेरीस संपुष्टात येतो आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाबसह उत्तराखंड आणि मणिपुरातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय वातावरण तापू लागलंय. पाचही राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार, यात शंका नाही.
उत्तर प्रदेश – एकूण जागा 403
भाजप 325
समाजवादी पक्ष 47
बसपा 19
काँग्रेस 7
पंजाब- एकूण जागा 117
भाजप 3
काँग्रेस 77
आप 20
अकाली दल 15
गोवा- एकूण जागा 40
भाजपा 17
कॉंग्रेस 13
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3
गोवा फॉरवर्ड – 3
मणिपूर – एकूण जागा 60
भाजपा 21
काँग्रेस 28
स्थानिक पक्ष 11
उत्तराखंड – एकूण जागा 70
भाजपा 57
काँग्रेस 11
स्थानिक पक्ष 2
खुलताबाद पंचायत समितीच्या उभसभापतीपदी प्रभाकर शिंदेंची निवड, भाजप कार्यकर्त्यांचा आनंदात जल्लोष
Fadnavis | अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वाद; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?