Marathi News Politics Lightman Employee served the village for 7 years, the villagers marched on horseback in nanded
उन-वारा-पावसात लाईटमनकडून सेवा, गावकऱ्यांकडून घोड्यावरुन मिरवणूक, सोन्या-नाण्याने सन्मान
नांदेडमध्ये सात वर्षे गावात सेवा देणाऱ्या एका विद्युत कर्मचाऱ्यांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलीय. कर्नाटक-तेलंगणा सीमेवरच्या महाराष्ट्रातील हानेगांवातील ही घटना आहे. सचिन पतंगे असे या विद्युत कर्मचाऱ्यांचे नाव असून तो हानेगांवात जनमित्र म्हणून कार्यरत होता.
1 / 4
नांदेडमध्ये सात वर्षे गावात सेवा देणाऱ्या एका विद्युत कर्मचाऱ्यांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलीय.
2 / 4
कर्नाटक-तेलंगणा सीमेवरच्या महाराष्ट्रातील हानेगावातील ही घटना आहे. सचिन पतंगे असे या विद्युत कर्मचाऱ्यांचे नाव असून तो हानेगावात जनमित्र म्हणून कार्यरत होता.
3 / 4
गावातील सात वर्षाच्या सेवेत त्याने अखंडितपणे विद्युत पुरवठा करण्यासाठी अहोरात्र सेवा केली. प्रशासकीय नियमानुसार आता पतंगेंची बदली झाल्याने गांवकऱ्यांनी त्यांना वाजतगाजत निरोप दिला.
4 / 4
इतकंच नाही तर गावकऱ्यांनी सोन्याचांदीच्या भेटवस्तू देऊन त्याचा सन्मान केलाय. विद्युत कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर रंगलेल्या या निरोप सोहळ्याची चर्चा पंचक्रोशीत रंगलीय.