लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे प्रत्येक तासाला नवनवीन घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट तुम्हाला इथ एकाच ठिकाणी वाचता येतील.
LIVE UPDATE :
काँग्रेसच्या बैठकीनंतर नसीम खान यांची प्रतिक्रिया
पहिलीच बैठक झाली, अजून बैठका बाकी आहेत, महाराष्ट्रात भाजपला थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत, काँग्रेस नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया
मी अजून बाजूला गेलेलो नाही, खोतकरांच्या दानवेंना कोपरखळ्या
जालना : मी अजून बाजूला गेलेलो नाही, एकाच व्यासपीठावरुन अर्जुन खोतकरांच्या रावसाहेब दानवेंना कोपरखळ्या, जालना मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी, मैत्रीपूर्ण लढतीवर अर्जुन खोतकर अजूनही ठाम, येत्या दोन दिवसांत जालन्याच्या जागेचा तिढा सुटणार
मुंबईत काँग्रेसची बैठक सुरु
काँग्रेसची लोकसभेच्या संदर्भात बैठक सुरु, विखे पाटील यांच्या बंगल्यावर बैठक सुरु, अशोक चव्हाण, नसीम खान आणि पृथ्वीराज चव्हाणही बैठकीला उपस्थित
दानवे-खोतकर एकाच व्यासपीठावर
जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर, जालन्यात लोखंडी पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमानिमित्त दोघे एकाच मंचावर, खोतकर आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत ओडिशात महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव
बिजू जनता दलतर्फे लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव, केंद्रापारा येथील प्रचारसभेत नवीन पटनाईक यांची घोषणा, लोकसभा निवडणुकीचा वेळापत्रक आज जाहीर होण्यापूर्वी ओडिशात मोठी घोषणा
संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आज संध्याकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असून, यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
आम्हाला गृहीत धरु नका – स्वाभिमानी
येत्या दोन दिवसात लोकसभा जागांबाबत निर्णय घ्या, खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आघाडीला अल्टिमेटम, स्वाभिमानीला गृहित न धरण्याचाही आघाडीला इशारा, 12 तारखेपर्यंत आघाडीने निर्णय न घेतल्यास 13 तारखेला आमच्या 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार, स्वाभिमानीकडून हातकणंगले, वर्धा आणि बुलडाण्याच्या जागांची मागणी