Loksabha Election 2024 | रात्री उशिरा 3.20 पर्यंत पंतप्रधान मोदींची अमित शाह, नड्डांसोबत महत्त्वपूर्ण बैठक, काय ठरलं?

| Updated on: Mar 01, 2024 | 8:07 AM

Loksabha Election 2024 | लोकसभा उमेदवारांची पहली लिस्ट भारतीय जनता पार्टी (बीजेपी) आज जारी करु शकते. CEC च्या बैठकीत उमेदवारांची नाव निश्चित झाली आहेत. रात्री जवळपास साडेचार CEC ची बैठक चालली. पीएम मोदी, अमित शाह, जेपी नड्डा उपस्थित होते.

Loksabha Election 2024 | रात्री उशिरा 3.20 पर्यंत पंतप्रधान मोदींची अमित शाह, नड्डांसोबत महत्त्वपूर्ण बैठक, काय ठरलं?
PM Narendra Modi-Amit Shah
Follow us on

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 ची भाजपाकडून जोरदार तयारी सुरु आहे. बैठकांच सत्र सुरु झालय. उमेदवारांची नाव फायनल केली जात आहेत. या दरम्यान गुरुवारी रात्री 11 वाजता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु झाली. पहाटे 3.20 म्हणजे तब्बल साडेचार तास ही बैठक चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत 16 राज्यातील अनेक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालय. भाजपाकडून आज उमेदवाराची पहिली यादी जाहीर होऊ शकते.

सर्वात आधी देशातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशच्या उमेदवारांबद्दल मंथन झालं. या बैठकीला यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक समितीने यूपीच्या उमेदवारांबद्दल जवळपास 25 मिनिट चर्चा केली. यूपीनंतर पश्चिम बंगालच्या उमेदवारांबद्दल चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांबद्दल चर्चा झाली. त्यानंतर छत्तीसगडमधील लोकसभेच्या सर्व जागांवर चर्चा झाली. भाजपा आज छत्तीसगडमधील लोकसभेच्या चार जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करु शकते.

या राज्यात 40 टक्के उमेदवार बदलणार

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, तेलंगण, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, उत्तराखंड, आसाम, गोवा, दिल्ली आणि जम्मू कश्मीर या 16 राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांबद्दल भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आसाममध्ये 40 टक्के उमेदवार बदलले जाऊ शकतात. सर्बानंद सोनोवाल यांना डिब्रूगढमधून निवडणूक मैदानात उतरवलं जाऊ शकतं. डिब्रूगढमधून केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाहीय. भाजपा रामेश्वर तेली यांना राज्यसभेवर पाठवू शकतो. सिलचरमधून राजदीप रॉय यांच तिकीट कापलं जाईल.

अजून काय ठरलं?

सीईसीच्या बैठकीत तेलंगणच्या उमेदवारांबद्दल सुद्धा मंथन झालं. भाजपा तीन विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देऊ शकते. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि केरळमधील सर्व जागांवर चर्चा झाली. यात 5 ते 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. राजस्थानच्या सर्व जागांबद्दल चर्चा झाली. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. जम्मू-काश्मीरबद्दल फक्त जम्मू रीजनच्या सीटबद्दल चर्चा झाली. प्रदेश अध्यक्ष रविंद्र रैना यांना निवडणुकीत उतरवलं जाऊ शकतं. राजौरी आणि अनंतनाग इथून रविंद्र रैना निवडणूक लढवू शकतात.