Loksabha Election 2019 Live Updates : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो दिसणार आहे.
लोकसभेसाठी कधीपासून मतदान? महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मतदान
LIVE UPDATE :
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार
लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती
कुठल्या टप्प्याचं कधी मतदान :
कुठल्या टप्प्यात किती मतदारसंघात मतदान?
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
Election Commission of India to hold a press conference at 5pm today. pic.twitter.com/M8hrrpQBr4
— ANI (@ANI) March 10, 2019
महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभा?
महाराष्ट्रात तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबतच होतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबत होणार नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या दरम्यान संपणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यात या निवडणुका अपेक्षित असतात.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. जागावाटपापासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत सर्वच हालचालींना वेग आला आहे. अनेक पक्षांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचारही सुरु केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं बिगुल महिन्या-दोन महिन्याभरापूर्वीच वाजले आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना आणखी वेग येईल.
संबंधित बातम्या
तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा
महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून मतदान, 23 मे रोजी निकाल
महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार?