Baramati Election | बारामतीच्या पीचवर Pawar vs Pawar मॅचला सुरुवात, आजचा दिवस महत्त्वाचा

| Updated on: Feb 23, 2024 | 1:28 PM

Baramati Election | आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्राच्या एका मतदारसंघाच्या निकालावर सगळ्या राज्याच लक्ष असेल. तो मतदारसंघ म्हणजे बारामती. कारण पहिल्यांदाच शरद पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान मिळाल आहे. अजित पवारांनी जी राजकीय भूमिका घेतली, त्यावर जनतेच्या मनात काय आहे? हे सुद्धा निकालातून स्पष्ट होणार आहे.

Baramati Election | बारामतीच्या पीचवर Pawar vs Pawar मॅचला सुरुवात, आजचा दिवस महत्त्वाचा
supriya sule vs sunetra pawar
Follow us on

Baramati Election (योगेश बोरसे) | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्राच सर्वाधिक लक्ष असेल ते बारामतीच्या निकालावर. कारण इतक्या वर्षात पहिल्यांदाच शरद पवारांना बारामतीच्या पीचवर चॅलेंज मिळणार आहे. महत्त्वाच म्हणजे हा विरोधक बाहेरचा नसून घरातला आहे. त्यामुळे या पवार विरुद्ध पवार मॅचवर सगळ्यांच लक्ष असेल. शरद पवारांना त्यांचा पुतण्या म्हणजे अजित पवारांकडून आव्हान मिळालय. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवारांकडे आहे. दोन्ही पवारांची बारामतीच्या राजकारणावर घट्ट पकड आहे. अगदी ग्रामपंचायतीचा उमदेवारही दोन्ही पवारांच्या मर्जीतला असतो. यावेळी लोकसभेला बारामतीमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.

बारामतीकर कोणाला कौल देतात? शरद पवार की अजित पवार? याची सगळ्या महाराष्ट्राला उत्सुक्ता आहे. शरद पवार यांच्या गटाकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. दोन्हीपैकी जो उमेदवार निवडूक येईल, त्यावरुन कुठल्या पवारांना बारामतीची पसंती ते स्पष्ट होईल. बारामती हा शरद पवार आणि अजित पवार दोघांचा बालेकिल्ला. विधानसभेला अजित पवार आणि लोकसभेला सुप्रिया सुळे हे बारामतीच ठरलेलं समीकरण आहे. पण यावेळी हे समीकरण बदलणार आहे. कारण यापुढच्या राजकारणात अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे परस्परांचे राजकीय़ प्रतिस्पर्धी असतील. बारामतीच्या राजकीय पीचवर नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.

बारामतीमध्ये रणधुमाळीला सुरुवात

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये परस्पराच्या विरोधात असतील, हे जवळपास स्पष्ट होऊ लागलय. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे आजा बारामती मतदारसंघातील गावां भेटी देणार आहेत, तर सुनेत्रा पवार बारामतीमधील विविध विकासकामांच भूमिपूजन करणार आहेत. काल जय पवारांनी गावभेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये रणधुमाळीला सुरुवात झालीय.