मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित आमदारकीवरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या प्रस्तावित नावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नकार दिला जाणार असल्याचा असा आरोप केला आहे. मुश्रीफांचा हा आरोप फेटाळून लावत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुश्रीफ यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मुश्रीफांचा दावा म्हणजे गावगप्पा आहेत, असं म्हणत भांडारी यांनी मुश्रीफांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. (Madhav Bhandari given answer to allegations made by Hasan Mushrif on MLAs nominated by the Governor)
“हसन मुश्रीफांचा हा दावा पू्र्णपणे खोटा आहे. त्यांच्या या गावगप्पा आहेत. ग्रामविकास मंत्रीपदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मात्र, जे काम आपल्याला झेपत नाही त्याबद्दल अपप्रचार करण्याची राष्ट्रवादीची पद्धतच आहे,” अशी टीका माधव भांडारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
तसेच, मुश्रीफांचा आरोप फेटाळून लावताना प्रस्तावित आमदारांची यादी मंजूर होऊ नये ही शरद पवारांचीच योजना असू शकते, असा पलटवारही त्यांनी राष्ट्रवादीवर केला. “शरद पवार यांचं राजकारण खुद्द पवार सोडून बाकी कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आमदारांची ही यादी मंजूर होऊ नये, अशी योजना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही असू शकते.” असा दावाही त्यांनी केला.
हसन मुश्रीफ काय म्हणाले ?
“कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी भय्यासाहेब माने, जिल्हा बँकेचे युवराज पाटील गेले होते. सांत्वन केल्याच्या काही मिनिटांतच चंद्रकांत पाटलांचं तिथं आगमन झालं. विनय कोरे आणि चंद्रकांत पाटलांची सांत्वनपर चर्चा झाली. त्यावेळी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार असल्याच्या बातमीचा विषय निघाला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं आहे. असं कोरेंना सांगितलं असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होतात.
संबंधित बातम्या :
विधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत
Anand Shinde | राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?
(Madhav Bhandari given answer to allegations made by Hasan Mushrif on MLAs nominated by the Governor)