भोपाळ | 30 नोव्हेंबर 2023 : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या एक्झिटपोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मात्र, हे एक्झिटपोलचे अंदाज आहेत. प्रत्यक्ष 3 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होईल तेव्हाच राज्याचं खरं चित्र समोर येणार आहे. मध्यप्रदेशात 230 जागांसाठी मतदान झालं होतं. मध्यप्रदेशात भाजपचं सरकार गेल्यास त्याचं फार मोठं नुकसान भाजपला होणार आहे. या निकालाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होताना दिसणार आहे.
1) पोल स्टेट एक्झिट पोल
काँग्रेस – 111-121
भाजप – 106-116
2 ) इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल (India Today-Axis My India exit poll)
काँग्रेस – 97-107
भाजप – 118-130
3) झी न्यूज एक्झिट पोल
काँग्रेस – 111-121
भाजप – 106-116
4) जन की बात
काँग्रेस – 102-125
भाजप – 100-123
5) रिपब्लिक – मॅट्रीज (Republic TV-P-Marq)
काँग्रेस – 118-130
भाजप – 97-107
6) सीएनएक्स
काँग्रेस- 111
भाजप- 116
पोल ऑफ पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत असलं तरी भाजपलाही चांगलं यश मिळालेलं दिसत आहे. भाजपला बहुमतासाठी फक्त दहा बारा जागा कमी पडताना दिसत आहेत. सर्व्हेच्यानुसार 45 टक्के मते काँग्रेसच्या खात्यात गेली आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा फायदा होताना दिसत आहे. 8 हजार मतदारांचा सर्व्हे करून हा पोल ऑफ पोल जाहीर करणअयात आला आहे. त्यानुसार 48 टक्के पुरुष व्होटर्स काँग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसत आहे. तर 43 टक्के महिला मतदारही काँग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाची हवा बदलताना दिसत असून भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं दिसून येत आहे.
पोल स्टेट एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 45.6 टक्के मते मिळाली होती. तर भाजपला 43.3 टक्के मते मिळाली होती. फक्त दोन टक्के मतांचा दोन्ही पक्षात अंतर आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात काँग्रेसला एकगठ्ठा मते मिळाल्याने काँग्रेसने मुसंडी मारली आहे.