Assembly Election 2023 | मध्य प्रदेशात ‘लाडली’ची ‘शिवराज’ला साथ, भाजपच्या विजयामागचे गणित

| Updated on: Dec 03, 2023 | 11:42 AM

Madhya pradesh Assembly Election 2023 | मध्य प्रदेशात भाजप सरकार येणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप सरकार येण्यामागे शिवराज सरकारच्या दोन योजना महत्वाच्या ठरल्या आहेत. लाडली लक्ष्मी योजना आणि लाडली बहना योजनेची जादू मध्य प्रदेशात चालली.

Assembly Election 2023 | मध्य प्रदेशात लाडलीची शिवराजला साथ, भाजपच्या विजयामागचे गणित
Follow us on

भोपाळ | 3 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष पुन्हा सरकार बनवण्याकडे दमदार वाटचाल करताना दिसत आहे. यंदा मध्य प्रदेशात बंपर मतदान झाले. या मतदानात महिलांचा वाटा लक्षणीय होता. 2018 मधील विधानसभा निवडणुकीत 75.63 टक्के मतदान झाले होते आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. आता त्यापेक्षा जास्त 76.55 टक्के मतदान झाले. त्यात महिलांनी शिवराजसिंह चौहान यांनी साथ दिली. शिवराज सरकारची ड्रीम योजना लाडली लक्ष्मी योजना (Ladli Laxmi Yojana) आणि लाडली बहना योजनेची जादू चालली आणि काँग्रेसच्या गॅस सिलेंडर मोफतच्या आश्वासनाही मतदार बळी पडले नाही. यंदा सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजप 160 जागांवर आघाडी घेत पुन्हा सरकार बनवण्याकडे वाटचाल करत आहे.

50 टक्के महिला भाजपबरोबर

मतमोजणीच्या कलानुसार 50 टक्के महिला भाजपबरोबर राहिल्या आहेत. महिलांना शिवराज सरकारने सुरु केलेली योजना लाडली लक्ष्मी आणि लाडली बहना योजना चांगलीच आवडली. लाडली बहना योजनेत भाजप सरकार महिलांना 1250 रुपये दर महिन्याला देत आहे. काँग्रेसने 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मतदारांनी शिवराजसिंह चौहान यांनाच साथ दिली. शिवराज सरकारने या योजनेचा निधी टप्पाटप्याने तीन हजार करण्याची घोषणा केली. काँग्रेसपेक्षा दुप्पट रक्कम आम्ही देत असल्याचा संदेश भाजपने दिला. यामुळे जनतेला काँग्रेसची नारी सम्मान योजना काही आवडली नाही.

हे सुद्धा वाचा

लाडली लक्ष्मी योजना

मध्य प्रदेश सरकारची लाडली लक्ष्मी योजनाही शिवराज सरकारने सुरु केली होती. शिवराज सरकार मुलींच्या शिक्षणासाठी या योजनेतून निधी देत आहे. तसेच मेडिकल, इंजीनिअरींग आणि लॉ करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी राज्य सरकार भरत आहे. योजनेत मुलाच्या जन्मापासून लग्नापर्यंतची जबाबदारी उचलत आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 11,000 रुपयांची मदत दिली जाते. मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपये दिले जातात. यामुळे महिला शिवराज सरकारच्या पाठिशी राहिल्या. शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: महिला मतदार भाजपच्या पाठिशी राहिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.