भोपाळ : भारतीय जनता पार्टीने मोहन यादव यांना मध्य प्रदेशच नवीन मुख्यमंत्री बनवलय. ते शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा होताच शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवराज यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला खूपच भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, आम्ही तुम्हाला निवडलं होतं, तुम्ही निवडणुकीत इतकी मेहनत केलीत. शिवराज सिंह चौहान मंगळवारी आपल्या समर्थकांना भेटले. त्यावेळी ते भावूक झाले. शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, “मी जेव्हा कोणी नव्हतो, तेव्हा सुद्धा मुलींची लग्न लावून द्यायचो. मुख्यमंत्री बनल्यानंतर मी लाडली बेटी आणि कन्या विवाह योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून मी मुली आणि बहिणीच जीवन सुधारु शकलो”
“मध्य प्रदेशची कमान हाती आली, तेव्हा हे एक बीमारु आणि मागास राज्य होतं. मी पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केलं. कृषी क्षेत्रात चमत्कार झाला. याच मला समाधान आहे” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. “बाबू लाल गौर यांच्यानंतर मी मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळली. 2008 आणि 2013 साली पुन्हा भाजपाच सरकार बनलं. 2018 मध्ये जागा कमी मिळाल्या पण मत जास्त मिळाली. माझ मन आनंदी आणि समाधानी आहे. पीएम मोदी, केंद्राच्या योजना आणि लाडली बहनमुळे पुन्हा सत्तेवर आलो” असं त्यांनी सांगितलं.
‘हे अद्भुत आहे’
“मुख्यमंत्रीपदावर असताना, माझ जनतेसोबत प्रेमाच नातं होतं. जो पर्यंत माझा श्वास चालू राहील, तो पर्यंत मी हे नातं तुटू देणार नाही” असं शिवराज यांनी सांगितलं. “जनताच देव आहे. मुलं छोटे मामा म्हणून बोलवायचे. हे अद्भुत आहे, ना सोडू शकत, ना विसरु शकत. मी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी लाडली बहन योजना 6 महिन्यांच्या आत सुरु केली आणि व्यवस्थित लागू सुद्धा केली” असं शिवराज सिंह चौहान म्हमाले.
भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत शानदार प्रदर्शन केलं आहे. पक्षाने तीन राज्यात बहुमत मिळवलय. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी भाजपाने मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावाची आज घोषणा होऊ शकते.