सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पुणे : मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजप महायुतीने ना युतीच्या चर्चेत महादेव जानकर यांना स्थान दिले, ना जागावाटपात जागा दिली. त्यामुळे रासपचे कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या फेसबुक आणि व्हाट्सअॅप प्रोफाईलवर उलटे कमळ हे चिन्ह लावले आहे. जोपर्यंत मंत्री महादेव […]

सोशल मीडियावर उलटे कमळ, भाजपविरोधात रासपची मोहीम
Follow us on

पुणे : मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजप महायुतीने ना युतीच्या चर्चेत महादेव जानकर यांना स्थान दिले, ना जागावाटपात जागा दिली. त्यामुळे रासपचे कार्यकर्ते नाराज आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या फेसबुक आणि व्हाट्सअॅप प्रोफाईलवर उलटे कमळ हे चिन्ह लावले आहे. जोपर्यंत मंत्री महादेव जानकर यांचा आदेश येणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व रासपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक प्रोफाईलवर भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह हे उलटे लावणार आहेत.

रासपच्या या सोशल मीडियावरील मोहिमेत प्रामुख्याने प्राध्यापक लक्ष्मण हाके, पुणे जिल्हाध्यक्ष हरीश खोमणे, पुणे युवक शहराध्यक्ष उमेश कोकरे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित कुमार पाटील, खडकवासला युवक अध्यक्ष प्रथमेश गवळी, बारामती लोकसभा प्रभारी बापूराव सोलनकर, सोशल मीडिया अध्यक्ष समाधान कचरे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या प्रोफाइल ला उलट्या कमळाची प्रतिमा लावलेली आहे.

“भाजपकडून रासपला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे रासप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, रासपने निवडणूक लढावी आणि आपले स्वतंत्र अस्तित्व भाजपला दाखवून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. महादेव जानकर यांना डावलण्यात येत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, ज्या भाजपला ग्रामीण भागात झेंडा धरायला कार्यकर्ता मिळत नव्हता, तिथे रासपचा आधार घेऊन भाजपने 2014 ची निवडणूक जिंकली. तोच भाजप आज रासपला टाळत आहे.” असे प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले.