राज्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूयं. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. तसेच पुरामध्ये अनेकजण वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही अजूनही काही जिल्हांमध्ये महसूल कर्मचारी पंचनामे करण्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीयं.
Follow us on
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाने राजकिय वातावरण चांगलेच गरम होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपाने सरकार स्थापन केले. सत्तासंघर्षाच्या काळात राजकिय (Politics) घडामोडींना प्रचंड वेग आला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी तर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. अशा वेळी राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी, असे आवाहनच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे.
इथे पाहा आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्विट
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”. आता राजकिय वर्तुळात आदित्य ठाकरे यांच्या या ट्विची जोरदार चर्चा रंगू लागलीयं.
पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. तसेच पुरामध्ये अनेकजण वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही अजूनही काही जिल्हांमध्ये महसूल कर्मचारी पंचनामे करण्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीयं. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागलीयं.