महाराष्ट्रातील घडामोडींचा सविस्तर आढावा
अकोला कोरोना अपडेट :
अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात 173 रुग्ण पॉझिटिव्ह, दिवसभरात 2151 अहवालापैकी 1978 जणांचे अहवालात निगेटिव्ह, एकूण कोरोना बाधितांचा आकडा 19500 वर, दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू, कोरोनामुळे आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू, दिवसभरात 233 जणांना डिस्चार्ज, तर 14342 जणांनी कोरोनावर मात, सध्या 4769 रुग्णांवर उपचार सुरु
नाशिक कोरोना अपडेट :
– नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम
– जिल्ह्यात आज 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
– जिल्ह्यात मृत्यूचा एकूण आकडा गेला 2149 वर
– आज 537 नव्या कोरोना बाधितांची नोंद
– नाशिक शहर – 411, नाशिक ग्रामीण – 71, मालेगाव – 41, जिल्हा बाह्य – 4
– सध्या 4 हजार 396 रुग्णावर उपचार सुरु
मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणात घडामोडींना वेग, NIA च्या टीमने मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांची भेट घेतली, केस संदर्भात डिटेल माहिती घेतली, NIA टीम एंटीलिया वर ही गेली होती, तसेच टीमकडून रेतीबंदर खाडीची देखील पाहणी
दमण दीवचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख , उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सचिन वाझे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांना घरातून उचललं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सचिन वाझे यांच्या मागे लागले, असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, याची आमाही चौकशी करतोय, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत घोषित केले.
देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेना नेते संसंदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्यांना अटक करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेनच्या पत्नीचा जबाब विधानसभेत वाचून दाखवला. सचिन वाझे म्हणत होते माझ्या पतीला सदर केस मध्ये अटक हो, जामीनावर मी तुला सोडवून घेतो. त्यानंतर ते तणावामध्ये होते. धनंजय गावडेच्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचं लोकेशन आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मनसुख हिरेनच्या पत्नीचा जबाब, सचिन वाझे म्हणत होते जामीनावर मी तुला सोडवून घेतो,
त्यानंतर ते तणावामध्ये होते, धनंजय गावडेच्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचं लोकेशन आहे. मनसुख हिरेन प्रकरणातील विमला हिरेन यांचा जबाब फडणवीस विधानसभेत वाचून दाखवत आहेत. तीन दिवस ते सचिन वाझेकडे होते. सचिन वाझेच्या सांगण्यावरून तक्रार करून घेतली. सचिन वाझेंना अटक करा – देवेंद्र फडणवीस
बीड: स्टीलच्या दुकानात दरोडा
शहरातील राष्ट्रवादी भवन समोरील घटना
जवकर बंधूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांनी तांबा, पितळ केले लंपास
लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
घटनास्थळी बीड पोलीस दाखल
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत तर काही ठिकाणी कमी होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त यांना त्यांच्या अधिकारात निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. नाईट क्लबवर बंद होत नाहीत, असं दिसतेय, नाई क्लबवर कारवाई करण्यात येईल.
मुंबई आणि ठाणेमध्ये कोरोना केसेस वाढलेल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात. बाहेरच्या देशात लॉकडाऊन, अंशत: लॉकडाऊन करणं हाच मार्ग वापरण्यात आला. राज्य सरकार म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील जनतेने देखील जबाबदारी घेण्याची गरज आहे.
विधिमंडळातील कामकाजाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचा दिवस असून आज दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु राहील.
आज विधिमंडळात काय?
ठरलं ! विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणारhttps://t.co/5YtuSKEOmU#anilparab | #Maharashtra | #Maharashtra | #uddhavthackeray | #ajitpawar | #balasahebthorat | @NCP | @INCMaharashtra | @ShivSena | @advanilparab
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता मावळली
कोरेना पार्श्वभूमी, अनेक आमदार गैरहजर त्यामुळं निवडणूक होण्याची शक्यता नाही.
काँग्रेस यासाठी आग्रही होती पण निवडणूक शक्य नसल्यानं शक्यता मावळली