सावंतवाडीत दीपक केसरकर चौथ्यांदा मिळवणार विजय? राजन तेलींकडून आव्हान

| Updated on: Nov 23, 2024 | 1:26 AM

सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि त्यानंतर 2014, 2019 मध्ये शिवसेनेकडून ते विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेनं 1999 पासून इथं आपली पकड मजबूत केली.

सावंतवाडीत दीपक केसरकर चौथ्यांदा मिळवणार विजय? राजन तेलींकडून आव्हान
Deepak Kesarkar VS Rajan Teli
Image Credit source: Tv9
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री दीपक केसरकर चौथ्यांदा विजय मिळविण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन तेली यांचं आव्हान आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर दीपक केसरकर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. या मतदारसंघात महायुतीची जेवढी ताकद आहे, तेवढीच महाविकास आघाडीचीही ताकद असल्याने ही लढत तुल्यबळ होणार आहे.

2009 मध्ये दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले. केसरकर यांच्या सलग विजयामुळे शिवसेनेनं सावंतवाडीत आपलं स्थान भक्कम केल्याचं दिसून आलं. दीपक केसरकर यांना 2014 मध्ये चांगल्या मतांनी विजय मिळाला होता. 2019 मध्येही त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली होती. केसरकर यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव केला. आता राजन तेली तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मतदारसंघातील जनतेवर असलेला प्रभाव, तगडा जनसंपर्क आणि विकासकामांमधून जोडलेला समर्थक वर्ग या सर्व केसरकरांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र सलग 15 वर्षे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आणि साडेसात वर्षे मंत्रिपद भूषवल्यानंतरही इथल्या काही समस्या सोडवण्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्याविरोधात नाराजीसुद्धा आहे.

इथल्या स्थानिक राजकारणात तसं पाहायला गेल्यास केसरकर आणि नारायण राणे यांचं फारसं कधी पटलं नाही. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी केसरकर आणि राणे यांच्यात मनोमिलन झालं. त्यावेळी दीपक केसरकर यांनी नारायण राणेंची मदत केली होती. राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन तेली यांनी केसरकरांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण तेली यांनी निवडून येणं राणेंसाठी फारसं सोयीचं नाही. म्हणूनच ते केसरकरांच्या पाठीशी उभे आहेत. नारायण राणे मदतीला आल्याने केसरकर यांचं बळ वाढलेलं आहे.

हे सुद्धा वाचा

सावंतवाडी विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage