Eknath Shinde | अफवांवर विश्वास ठेवू नका, शरद पवारांशी भेट नाही, फोटो जुना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण!

| Updated on: Jul 06, 2022 | 1:04 PM

व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असं ट्विट मु्ख्यमंत्र्यांनी केलंय.

Eknath Shinde | अफवांवर विश्वास ठेवू नका, शरद पवारांशी भेट नाही, फोटो जुना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण!
शरद पवार यांच्या भेटीचा हा फोटो मुख्यमंत्री होण्यापूर्वीचा आहे, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली होती. ही बातमी खरी नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, माझी आणि शरद पवार यांची नुकतीच कोणतीही भेट झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये फिरत असलेले फोटो जुन्या भेटीचे आहेत, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिंदे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आमची भेट झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज सकाळपासूनच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शिंदेंनी शरद पवार यांची भेट का घेतली, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली. मुख्यमंत्र्यांनी या चर्चांवर आता पूर्णविराम दिला आहे.

‘सिल्वर ओक’ भेटीची अफवाच!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे निवास स्थान असलेल्या सिल्वर ओकवर भेट घेतली. तसेच पवार यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला, असा माहितीखाली शरद पवारांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं ट्विट काय?

शरद पवार यांच्या भेटीबाबत पसरलेल्या अफवांना फेटाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये…

शरद पवारांचा इशारा काय?

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचं सरकार आलं आहे. मात्र बंडखोरांच्या आधारावर सत्तेत आलेलं हे सरकार फार काळ टिकाणार नाही. लवकरच मध्यवधी निवडणुका घ्याव्या लागणार असून सर्व आमदारांनी यासाठी सज्ज रहावं, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.