“ड्रग्ज विकणाऱ्यांवर, ठेवणाऱ्यावर, पब, हॉटेल जिथे ड्रग्ज विक्री होते, तरुण पिढी बरबाद करण्याच काम जे लोक करतात, त्यांच्यावर पुण्यात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली. फक्त पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक नाही, तर संपूर्ण राज्यात जिथे, जिथे ड्रग्ज विक्री होत असेल, शाळा, कॉलेजेस येथे ड्रग्ज विकून तरुण पिढी बरबाद करत असतील, तर त्यांना अजिबात सोडणार नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“ड्रग्जची पाळमुळं उखडून फेकण्याच काम पोलीस, प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका करतय. पेडलर, मोठे सप्लायर असतील, कोणी कितीही मोठा माणूस असेल तरी सोडणार नाही. सरकार डोळ्यासमोर तरुणपिढी बरबाद होऊ देणार नाही. शहर, राज्य ड्रग्ज मुक्त होत नाहीत, तो पर्यंत बुलडोजर, तोडफोड कारवाई सुरु राहील” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘त्यांच्यावरही बुलडोझर चालवणार’
“संपूर्ण राज्यभरात ही कारवाई सुरु आहे. जिथे, जिथे ड्रग्य विक्री होईल, तिथे ही कारवाई होईल. अनधिकृत धंदे बंद करण्याची कारवाई सुरु राहील” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. वारीच्या प्रश्नावर म्हणाले की, “मी स्वत:हा वारीला जाणार आहे. मला तिथे बोलावल आहे. त्यावेळी इंद्रायणी नदीची पाहणी करेन. तिथल्या अधिकाऱ्यांना निर्देश देईन. इंद्रायण नदी प्रदूषण मुक्त करण्याची सरकारची भूमिका आहे” मुंबईत देखील खड्डयातून पांढरा पैसा केलाय, त्यांच्यावरही बुलडोझर चालवणार असं शिंदे म्हणाले.