Uddhav Thackeray Live मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन (Shivsena Foundation Day) आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आज सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान झाली आहे. सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी हिंदुत्त्व, स्वबळाचा नारा, शिवसैनिकांचं काम, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेला विचार, मुंबईत मराठी माणसाला शिवसेनेनं मिळवून दिलेला स्वाभिमान याविषयी भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारनं कोरोना संकटात केलेल्या कामाची माहिती दिली. कोरोना काळातल्या राजकराणावरुन उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांना फटकारलं आहे. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा, असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असं सांगतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, आम्ही स्वाभिमानाने चालू, आमच्या ताकदीवर चालू असा सूचक इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या राजकीय पक्षांना दिला.
मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना अभिवादन, माझ्या शिवसैनिकांना कुटुंबीयांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेय यांनी दिल्या. प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सन आहेत, 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि १३ ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय, अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन. शिवसेनेने रंग आणि अंतरंग पाहिले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे, पण अनेकजण आहेत, अनेक मागण्या करत आहेत. दुकाने उघडा, व्यायामशाळा उघडा वगैरे मागणी करतात.. तर आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवंच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला, मराठी माणसाला स्वाभिमान दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं, तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा.. माझ्यासाठी स्वबळ हे आहे.. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक असते. आपले काही पराभूत उमेदवार होते, त्यांना सांगितलं तुम्ही पराभूत झाला असला तरी मनाने खचलेले नाहीत. हे बळ आहे ते स्वबळ आहे. अनेक संकटं आली, त्या संकटांना घाबरुन चालणार नाही. घाबरलो तर मी शिवसैनिक कसला, मी मा आणि बाळासाहेबांचा मुलगा कसला. आजोबा सांगायचे संकटाच्या छाताडावर बसा. स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे, केवळ निवडणुका नाही, न्याय हक्कासाठी हा नारा आहे, मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी वापरलं जाणारं ते स्वबळ आहे
देशाभिमान पहिला, आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं.. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करु नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची आशीर्वाद मिळवणं, त्यासाठी काही करत असू तर याचा अर्थ हे सोडलं आणि ते धरलं असा त्याचा अर्थ होत नाही.
शिवसेनाप्रमुखांचं एक भाषण व्हायरल होतंय, ते का होतंय हे आपल्याला माहितीय.. याला शिवसैनिक म्हणतात.. नुसती हाणामाऱ्या करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हे आपलं गुणधर्म नाही, अन्यायावर वार करणारा शिवसैनिक आहे.. पण रक्तपाताची ओळख मुद्दामून कोणी करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख अनेकांना आहे, पण 92-93 च्या दंगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती. ही सुद्धा शिवसेनेची ओळख.. ज्या ज्या वेळी रक्तदान करण्याची वेळ येते, त्यावेळी शिवसैनिक सर्वात आधी पुढे येतो.. हे आमचं हिंदुत्व आहे, आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेकवेळा नैसर्गिक आपत्ती येते, वादळं, पूर, दुष्काळ, साथ येते त्यावेळी सर्वात आधी धावून जातो तो शिवसैनिक.. बदनाम करण्यासाठी आरोप करायचं आणि पळून जायचं. पण आरोप करतोय तू कोण आहेस, स्वत:चा चेहरा पाहिलाय का? आम्ही आमच्या रुबाबत चाललोय, जर शिवसेनेचं राजकारण हीन दर्जाचं असतं, तर शिवसेना टिकली नसती.
राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा, असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असं सांगतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, आम्ही स्वाभिमानाने चालू, आमच्या ताकदीवर चालू असा सूचक इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला.
माझा डॉक्टर, माझं कुटुंब माझी जबाबदारी, कोरोनामुक्त गाव हे उपक्रम राबवले. कोरोनातून आपल्याला बाहेर पडायचा असेल तर प्रत्येक घरातला माणूस जोपर्यंत या लढ्यात सहभागी होत नाही तोपर्यंत कोरोनावर मात करता येणार नाही.
शिवसेनेचा जन्म न्याय हक्कांसाठी झालेला आहे. शिवसेना स्वाभिमानानं पुढील वाटचाल करेल. शिवसेना पुढे नेण्याची जबाबादारी आपल्यावर आली आहे. शिवसेना हा एक विचार आहे.
शिवसेनाप्रमुखांचं एक भाषण व्हायरल होतंय, ते का होतंय हे आपल्याला माहितीय.. याला शिवसैनिक म्हणतात.. नुसती हाणामाऱ्या करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हा आपलं गुणधर्म नाही, अन्यायावर वार करणारा शिवसैनिक आहे.. पण रक्तपाताची ओळख मुद्दामून कोणी करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख अनेकांना आहे, पण ९२-९३ च्या दंगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती.. ही सुद्धा शिवसेनेची ओळख.. ज्या ज्या वेळी रक्तदान करण्याची वेळ येते, त्यावेळी शिवसैनिक सर्वात आधी पुढे येतो.. हे आमचं हिंदुत्व आहे, आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठी आहे..
अनेकवेळा नैसर्गिक आपत्ती येते, वादळं, पूर, दुष्काळ, साथ येते त्यावेळी सर्वात आधी धावून जातो तो शिवसैनिक.. बदनाम करण्यासाठी आरोप करायचं आणि पळून जायचं. पण आरोप करतोय तू कोण आहेस, स्वत:चा चेहरा पाहिलाय का? आम्ही आमच्या रुबाबत चाललोय, जर शिवसेनेचं राजकारण हीन दर्जाचं असतं, तर शिवसेना टिकली नसती.
राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा, असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असं सांगतोय..
दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, आम्ही स्वाभिमानाने चालू, आमच्या ताकदीवर चालू
55 वर्षांची वाटचाल ही साधी वाटचाल नाही. शिवसेना पुढे नेऊन दाखवीन हे कशाच्या जोरावर सांगितलं. तुम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर तयार झालेला आहात. शिवसेना एक एक पाऊल पुढं जात आहे. स्वबळ हा जो भाग आहे. आपल्या देशात सुद्धा पंतप्रधान आहेत. आपण कोरोनाचा सामना करतो आहोत. वैद्यकीय शास्त्रानुसार कोरोना होऊन केल्यानंतर पोस्ट कोविड स्थितीबाबत कोण विचार करत असेल, असं वाटत नाही. कोरोनाच्या काळात ज्यांच्या कुटुंबातील आप्तस्वकीय सोडून गेले त्यांचा विचार कोण करणार? कोरोना लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार बुडालेत, रोजगाराचं काय होणार? पोस्ट कोविडच्या वातावरणात देशातील नागरिक अस्वस्थ होणार, आपण स्वबळाचा नारा दिला, एकहाती सत्ता आणू हा नारा दिल्यास लोक आपल्याला जोड्यानं मारतील. पोस्ट कोविड परिस्थितीचा विचार केला नाहीतर देशाची वाटचाल अस्वस्थेकडे चालली आहे, अशी परिस्थिती आहे.
निवडणुका, सत्ताप्राप्तीचा विचार बाजूला ठेऊन विचार करणं गरजेचं आहे. आर्थिक संकटाचा विचार न करता विकृत राजकारण करत राहिलो तर अवघड परिस्थिती आहे.
अनेक जण माझ्यावर टीका करतात की ते बाहेर पडत नाहीत. मात्र, घरात राहून काम करतोय. पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेच्या आठवणी नको वाटतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा फोन आला की धस्स व्हायचं. कोरोना संकटात जनतेनं, प्रशासनानं आणि शिवसैनिकांनी काम केलं त्यांचं अभिनंदन करतो.
रक्तपात करणं हा शिवसेनेचा गुणधर्म नाही. रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे. 1992-93 साली शिवसेना रस्त्यावर उतरली नसती तर मुंबई वाचली नसती. कोरोनाच्या काळात रक्तपुरवठा कमी होत चालला आहे, शिवसैनिकांना रक्तदानाचं आवाहन केलं.
देशाभिमान पहिला, आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं.. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करु नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची आशीर्वाद मिळवणं, त्यासाठी काही करत असू तर याचा अर्थ हे सोडलं आणि ते धरलं असा त्याचा अर्थ होत नाही.
आपल्या देशाच्या एकतेचा पाया प्रादेशिक अस्मिता आहे. त्या पायावर घाला झाला तर संघराज्याला तडा जाऊ शकतो. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्त्व म्हणजे पेटेंट कंपनी नाही. गेल्या 55 वर्षांचं राजकारण पाहिलं. राजकारणात जे काय चाललंय ते आपल्याला कळतंय. कोरोनाच्या काळात सध्या जे आपल्या देशात राजकारण चाललंय ते विकृतीकरण आहे.
शिवसेना प्रमुखांनी म्हटलं होतं गर्व से कहो हम हिंदू है.. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, हे मी नाही म्हणत शिवसेनाप्रमुख म्हटले होते.. हिंदुत्व आमचा पहिला देशाभिमान आहे, मग प्रदेश. … हिंदुत्वाचा पाया भाषावार प्रांतरचनेचा आहे. एक देश आणि अनेक देश हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. विविध भाषिक हे आपल्या देशाची ताकद आहे. प्रादेशिक अस्मितेवर कुणी घाला घालणार असेल तर त्याला उत्तर दिलं जातं.
शिवसेनेएवढं देशावर, राज्यावर प्रेम करायला सांगणारा पक्ष दुसरा कोणी नाही.. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणजे आधी देश मग राज्य हे आमचं आयुष्य आहे.
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे, पण अनेकजण आहेत, अनेक मागण्या करत आहेत. दुकाने उघडा, व्यायामशाळा उघडा वगैरे मागणी करतात.. तर आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवंच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला, मराठी माणसाला स्वाभिमान दिला.
स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं, तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा.. माझ्यासाठी स्वबळ हे आहे.. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक
आपले काही पराभूत उमेदवार होते, त्यांना सांगितलं तुम्ही पराभूत झाला असला तरी मनाने खचलेले नाहीत. हे बळ आहे ते स्वबळ आहे. अनेक संकटं आली, त्या संकटांना घाबरुन चालणार नाही. घाबरलो तर मी शिवसैनिक कसला, मी मा आणि बाळासाहेबांचा मुलगा कसला. आजोबा सांगायचे संकटाच्या छाताडावर बसा
स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे, केवळ निवडणुका नाही, न्याय हक्कासाठी हा नारा आहे, मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी वापरलं जाणारं ते स्वबळ आहे
गेल्या अनेक वर्ष स्थानिक लोकाधिकार समिती ही शिवजयंती संचलन होतं. त्या कार्यक्रमाला मी जातो. आजुबाजूची ऑफिस शिवसेनेच्या ताकदीकडे दुथडीभरून बघत असतात. शिवसेना नव्हती त्या काळात त्या इमारती मराठी माणसांसाठी बंद होत्या. शिवसेने ताकद वापरुन मराठी माणसांना तिथं प्रवेश मिळवून दिला. मराठी माणसाच्या मनगटात ताकद होती. एकेकाळी मराठी माणसांच्या हातात हिंदवी स्वराज्याची तलवार होती याची जाणीव करुन दिली. त्यानंतर मराठी माणसांमध्ये बळ संचारलं.
मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना अभिवादन, माझ्या शिवसैनिकांना कुटुंबीयांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सन आहेत, 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि १३ ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो.
गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय, अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन.
शिवसेनेने रंग आणि अंतरंग पाहिले.
गेली 55 वर्ष शिवसेना जोपासली आणि पुढं नेली त्यांना अभिवादन करतो. शिवसेना कुटुंबातील कुटुंबीयांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आजही मार्गदर्शन करत आहेत.
प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत. 23 जानेवारी, 19 जून आणि 13 ऑगस्ट हे तीन दिवस उत्सवासारखा साजरा करतो. गेली दीड वर्षातलं आपलं काम बोलतोय. सत्ता नाही म्हणून ज्यांचा जीव कासावीस होतोय त्यांचं ते बघतील.
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. सुभाष देसाई यांनी कोरोना काळात राज्य सरकार करत असलेल्या कामांची माहिती शिवसैनिकांना दिली. कोरोनाच्या दुसरी लाट ओसरली ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत, असं देसाई म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन (Shivsena Foundation Day) आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आज सर्व शिवसैनिकांशी थोड्याच वेळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार
कोरोनाची महाराष्ट्रातील परिस्थिती
शिवसेना भाजप यांच्यातील संघर्ष
राज्यात निर्माण झालेला आरक्षणाचा प्रश्न
मुंबई महापालिका निवडणूक
राज्यातील आगामीन निवडणुका स्वबळावर लढवणे
राम मंदिर
नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट
12 विधानपरिषद सदस्य भेट
शिवसेना भवनाबाहेरील राडा
राज्य सरकारच्या कामाविषयी